NEET, JEE 2020: ' लाखो विद्यार्थ्यांनी 24 तासांत अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड याची अर्थ  विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा हवी' - केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल
File image of Education Minister Ramesh Pokhriyal | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर देशात यंदाच्या जेईई मेन्स, नीट 2020 परीक्षा पुढे ढकला अशी जोरदार मागणी केली जात आहे. मात्र केंद्रीय शिक्षण संस्था यंदा नियोजित वेळेतच जेईई मेन्स अअणि नीट 2020 या प्रवेश परीक्षा घेण्यावर ठाम आहेत. दरम्यान त्याची हॉल तिकीट्स देखील जारी करण्यात आली आहेत. देशाचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal)यांनी ANI वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड केली आहेत म्हणजे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा हव्या आहेत. JEE, NEET Exam 2020: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविण्यासाठी जेईई, नीट परीक्षा आवश्यक- एनटीए

दरम्यान एएनआय ट्वीट नुसार, ' NTA DG ने दिलेल्या माहितीनुसार, जेईई परीक्षेसाठी 8.58 लाख विद्यार्थ्यांपैकी 7.5 लाख तर 15.97 लाखापैकी 10 लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेची अ‍ॅडमीट कार्ड्स 24 तासांमध्ये डाऊनलोड  केली आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा हव्या आहेत.' अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. (हेही वाचा, NEET Admit Card 2020 Released: नॅशनल टेस्टिंग एजंसी कडून नीट 2020 परीक्षा अ‍ॅडमीट कार्ड जारी; ntaneet.nic.in वरून करू शकाल डाऊनलोड)

ANI Tweet

कोरोनाच्या संकटात परीक्षा घेणं म्हणजे विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं आरोग्य धोक्यात घालण्यासारखं आहे. तसेच यामुळे देशात रूग्णसंख्येत भर पडू शकते. दरम्यान कॉंग्रेस पक्षानेही सरकारच्या या भूमिकेचा निषेध केला आहे. उद्या 28 ऑगस्ट दिवशी कॉंग्रेस कडून जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार करावा या मागणीसाठी आंदोलन केले जाणार आहे.

जेईई मेन्स आणि नीट परीक्षा यंदा जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच होईल असं सांगत एनटीएने विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र वाढवत असल्याचं सांगितलं आहे. सोबतच परीक्षा केंद्रांवर कॉन्टॅक्ट लेस प्रवेश आणि एक्झिट ठेवली जाईल. फेस मास्क, सॅनिटायझरचा वापर करून सुरक्षितपणे विद्यार्थ्यांनी परीक्षा द्याव्यात असं आवाहन एनटीएने केले आहे.