NEET 2021 Correction Window 14 ऑगस्ट ला बंद होणार; पहा ntaneet.nic.in वर आजच कसे कराल तुमच्या फॉर्म मध्ये बदल
Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

NTA कडून 11 ऑगस्टला NEET UG 2021 Online Application Form Correction window विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहे. आता तुम्हांला यामध्ये बदल करण्यासाठी उद्या म्हणजे 14 ऑगस्टला अखेरची संधी आहे.  NEET UG 2021 application form मध्ये काही बदल करायचे झाल्यास ती एक संधी विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून ही विंडो खुली केली जाते. यंदा नीट परीक्षा देणार्‍यांना ntaneet.nic.in  या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगिन डिटेल्स वापरून फॉर्म मध्ये काही बदल करायचे झाल्यास ते करण्याची मुभा असेल.

एनटीच्या माहितीपत्रकानुसार, 14 ऑगस्टला दुपारी 2 वाजता ही विद्यार्थ्यांसाठी ही वेबसाईट बंद होणार आहे. त्यामुळे आता शेवटचे काही तास विद्यार्थ्यांकडे आहेत. या डिरेक्ट लिंक वर क्लिक करून तुम्ही करेक्शन विंडो वर जाऊ शकता.

कसे कराल NEET UG 2021 Online Application Form Correction window मध्ये बदल?

  • अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in ला भेट द्या.
  • वेबसाईट वर ‘Correction Registration Form’ वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आयडी, पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • ‘Correction in Application Form Particulars’ या पर्यायवर क्लिक करा.
  • आता तुम्ही बदल करू शकता. ते बदल सेव्ह करू शकता.
  • बदल केल्यानंतर कंफरमेशन पेज येईल ते चेक करा आणि डाऊनलोड करा.

दरम्यान नीट 2021 च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नावात, संपर्क क्रमांक, पत्ता, कॅटेगरी, राष्ट्रीयत्त्व, PwBD status, शैक्षणिक पात्रता, जन्म तारीख यामध्ये बदल करता येऊ शकतो. दरम्यान या बदलांसाठी त्याला पुरावे म्हणून काही डॉक्युमेंट्स देखील अपलोड करावे लागणार आहेत.