महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कडून यंदाच्या एमपीएससी परीक्षेची अॅडमिड कार्ड जारी झाली आहेत. MPSC State Service Prelims Admit Card 2020 यंदा 2 मार्च 2021 पासून जारी झाली आहेत. ही अॅडमीट कार्ड्स एमपीएससी च्या mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करता येऊ शकतो. दरम्यान यंदाची एमपीएससी पूर्व परीक्षा 14 मार्च 2021 दिवशी होणार आहे. MPSC 2020 Exam Revised Dates: जाणून घ्या 2020 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती; 14 मार्च 2021 रोजी होणार राज्य सेवा पूर्व परीक्षा.
कोरोना संकट आणि मराठा आरक्षण याच्यामुळे एमपीएससी ची परीक्षा अनेकदा लांबणीवर पडली आहे. 11 ऑक्टोबर नंतर आता ही परीक्षा यंदा 14 मार्च दिवशी होणार आहे. त्यापूर्वी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. दरम्यान आता ही अॅडमिट कार्ड्स डाऊनलोड साठी उपलब्ध आहे.
कशी कराल एमपीएससी 2021 पूर्व परीक्षा अॅडमीट कार्ड डाऊनलोड?
- एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईट्स mahampsc.mahaonline.gov.in ला भेट द्या.
- होम पेज वर MPSC State Service Prelims Admit Card 2021 या लिंकवर क्लिक करा.
- नव्या पेजवर तुम्हांला login credentials टाकून अॅडमीट कार्ड पाहता येईल.
- स्क्रिन वर अॅडमीट कार्ड पाहून ते डाऊनलोड करून ठेवा.
यंदाच्या वर्षी 2.5 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. विविध विभागांमध्ये 200 पदांवर भरती होणार आहे. 23 डिसेंबरला या परीक्षेचं नोटिफिकेशन जारी झालं आहे तर 13 जानेवारी 2020 पर्यंत परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती.