Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

MHT CET Counselling 2020 मध्ये ME आणि MTech Courses साठीची सुरूवात 11 डिसेंबर पासून होणार आहे. दरम्यान याकरिता लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना cetcell.mahacet.org वर ऑनलाईन अर्ज दाखल करणं गरजेचे आहे. महाराष्ट्रच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष कडून काऊन्सलिंग घेतले जाते. याद्वारा एमई आणि एम टेक करणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जातात.

दरम्यान कट ऑफ मार्क्सनुसार ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले आहेत त्यांना काऊन्सिंग राऊंडमध्ये प्रवेश दिला जातो. 3 फेझमध्ये हे MHT CET ME आणि MTech counselling केले जाते. तर चौथी फेरी ही स्पॉट राऊंड असते. दरम्यान काल मंत्री उदय सामंत यांनी देखिल ट्वीटरच्या माध्यामातून या प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे.

महाराष्ट्रावर अजूनही कोविड 19 चं संकट घोंघावत आहे. त्यामुळे सेंट्रलाईज्ड अ‍ॅडमिशन प्रोसेस ही ऑनलाईन माध्यमातून घेतली जाणार आहे. काऊन्सलिंग प्रोसेस मध्ये रजिस्ट्रेशन, फी पेमेंट, डॉक्युमेंट व्हेरिफेकशन यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश हे त्यांचे मार्क्स आणि प्राधान्याक्रमाच्या आधारे दिले जाणार आहेत.

एमएचटी सीईटी मध्ये बीटेक, एमईए आणि अन्य प्रवेशप्रक्रियेसाठी काऊन्सलिंग राऊंडसची सुरूवात ही 9 डिसेंबर पासून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे. तर या प्रक्रियेमध्ये जेथे प्रवेश मिळेल तिथे विद्यार्थ्यांना 29 ते 31 डिसेंबर दरम्यान दाखल होणं हे गरजेचे आहे.