MHT CET Counselling 2020 ला सुरूवात; 15 डिसेंबरपूर्वी cetcell.mahacet.org वर अर्ज करण्याची अंतिम मुदत

महाराष्ट्रच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष कडून काऊन्सलिंग घेतले जाते. त्याला आता सुरूवात झाली आहे. दरम्यान लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्यांना आता या काऊन्सलिंग राऊंड्समध्ये सहभाग घेता येणार आहे.

MHT CET Counselling 2020 ला सुरूवात; 15 डिसेंबरपूर्वी cetcell.mahacet.org वर अर्ज करण्याची अंतिम मुदत
Online | Photo Credits: Pixabay.com

MHT CET 2020 काऊन्सलिंग राऊंड्सना आज ( 9 डिसेंबर) पासून सुरूवात झाली आहे. यामध्ये BTech, MBA आणि इतर प्रोग्राम्सचा समावेश आहे. महाराष्ट्रच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष कडून काऊन्सलिंग घेतले जाते. त्याला आता सुरूवात झाली आहे. दरम्यान लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्यांना आता या काऊन्सलिंग राऊंड्समध्ये सहभाग घेता येणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org ला भेट द्यावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचे आहे. होम पेजवर “New Registration”वर क्लिक करा. लॉग इन करण्यासाठी तुम्हांला एमएचटी सीईटी रोल नंबर आणि अ‍ॅप्लिकेशन नंबर देणं गरजेचे आहे. या ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशनसाठी अंतिम तारीख 15 डिसेंबर आहे. MHT CET PCM & PCB Results 2020: पीसीएम आणि पीसीबी सीईटी परीक्षांचे निकाल  जाहीर, कसा पाहाल निकाल.

इंजिनियरिंग कोर्सेससाठी प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट 18 डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे. तर अंतिम यादी 22 डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल. 9-16 डिसेंबर दरम्यान कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. प्रोव्हिजनल अलोटमेंट हे 28 डिसेंबर दिवशी जाहीर केले जाणार आहे. यादरम्यान ज्यांची निवडा केली जाईल त्या विद्यार्थ्यांना 29 ते 31 डिसेंबर मध्ये नेमून दिलेल्या इन्स्टिट्युट मध्ये दाखल होणं गरजेचे आहे.

पीसीएम पीसीबी ग्रुपचे सीईटी निकाल यंदा 28 नोव्हेंबर दिवशी जाहीर झाले आहेत. तर व्होकेशनल कोर्सचे निकाल 5 डिसेंबरला जाहीर झाले.

(The above story first appeared on LatestLY on Dec 09, 2020 03:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).