यंदाच्या बोर्ड परीक्षांच्या वेळेस नेमकी भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत असल्याने सरकारने विद्यार्थ्यांची सुरक्षा पाहता दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तात्पुरता विद्यार्थी, पालकांना सुखावणारी बातमी आणि निकालाच्या वेळेस टेंशन वाढवणारी आहे. यंदा परीक्षा न घेताच अंतर्गत मुल्यमापनाने बोर्डाचे निकाल (Board Result) जाहीर होत असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता कमालीची वाढली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी 15 जुलै पर्यंत राज्यात दहावीचा निकाल (Maharashtra Board SSC Result) लागणार असल्याचे सांगितले होते पण अद्यापही त्याची शिक्षण मंडळाकडून माहिती देण्यात आली नाही. मीडीया रिपोर्ट्सनुसार, येत्या काही दिवसांतच महाराष्ट्र बोर्ड देखील दहावीचा निकाल जाहीर करू शकतो त्यामुळे पालकांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून मिळणार्या अपडेट्स वर लक्ष ठेवणं गरजेचे आहे.
दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवठ्यामध्ये दहावीचा निकाल जाहीर होतो पण यंदा निकालाची पद्धत बदलल्याने आणि कोरोना निर्बंध पाहता दहावीचा निकाल लागण्यासाठी वेळ लागत आहे. पण या आठवड्यात 10 वीच्या विद्यार्थ्यांना निकाल हाती मिळण्याची दाट शक्यता आहे. मग तुमचा हा निकाल नेमका कसा, कधी, कुठे लावला जाणार आहे? याबद्दल तुमच्या मनात शंका असेल तर खालील माहिती वाचा आणि तुमच्या मनातील सारे प्रश्न दूर करा.
महाराष्ट्र बोर्ड 10 वी परीक्षेचा निकाल तारीख
महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न होता पण अद्याप त्याची माहिती दिलेली नाही. सर्वसाधारणपणे निकालाच्या दिवसाच्या किमान काही तास आधी शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख, वेळ सांगितली जाते.
महाराष्ट्र बोर्ड दहावी निकाल ऑनलाईन कुठे, कसा पहाल?
महाराष्ट्र बोर्डाकडून विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाईट्सवर प्रसिद्ध केला जातो. यामध्ये mahahsscboard.in या MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in वर किंवा इतर थर्ड पार्टी साईट्सवर जाहीर होतो.
साधारणपणे वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी तुम्हांला तुमचा रोलनंबर टाकावा लागतो आणि नंतर विषयानुसार मार्क्स, एकूण टक्के, पास, नापास हा सारा निकाल पाहता येतो.
महाराष्ट्र बोर्ड दहावी निकाल Passing Criteria
महाराष्ट्र बोर्ड यंदा दहावी निकाल लावताना Passing Criteria बदलणार आहे. यंदा परीक्षाचं न झाल्याने अंतर्गत मूल्यमापानाच्या आधारे 10वीचा निकाल लागेल. त्यामध्ये 9वीचे मार्क्स 50%, 10वीच्या असाईनमेंट 30% आणि 10वीच्या तोंडीपरीक्षा, प्रोजेक्ट्स 20% अशा फॉर्म्युल्याने अंतिम निकाल बनवला जात आहे. नक्की वाचा: Maharashtra Board SSC Result 2021: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितला यंदाच्या 10वीच्या परीक्षा निकालाचा फॉर्म्युला; 11वी प्रवेशासाठी द्यावी लागणार वैकल्पिक सीईटी.
यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाने बनवला जात असला तरीही 11वी प्रवेशाचादेखील फॉर्म्युला ठरला आहे. 11वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना एक ऐच्छीक सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. नक्की वाचा: 11th Std CET Format: 11 वी प्रवेशासाठी सीईटी परिक्षेचा पॅटर्न जाहीर, जाणून Exam बद्दल अधिक माहिती.
मागील वर्षी शिक्षण मंडळाकडून 10वीचा निकाल 29 जुलै तर 12वीचा निकाल 16 जुलैला जाहीर झाला होता. त्यावेळेस 95.30% विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या निकालामध्ये उत्तीर्ण झाले होते.