महाराष्ट्रात कोरोना वायरस संकटामुळे गेल्या वर्षभर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. पण ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले होते. दरवर्षी मार्च महिन्यापासून सुरू होणार्या बोर्डाच्या परीक्षा देखील कोविड 19 मुळे लांबणीवर पडल्या आहेत. पण शिक्षण मंडळ ऑफलाईन माध्यमातून या परिस्थितीमध्येही परीक्षा घेण्यासाठी सज्ज झाली आहे. मागील वर्षभराची स्थिती पाहता शिक्षण मंडळाने आता यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी(SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत थोडे बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा प्रॅक्टिकल परीक्षांऐवजी विद्यार्थ्यांना असाईनमेंट पूर्ण कराव्या लागतील तर लेखी परीक्षेसाठी देखील अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात आला आहे.या बदललेल्या वेळांनुसार बोर्डाने यंदा 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर जारी केले आहे. Maharashtra SSC, HSC Exam 2021 Question Banks जाहीर; 10वी, 12 वीचे विद्यार्थी maa.ac.in वर डाऊनलोड करू शकतात विषयनिहाय प्रश्नपेढी.
राज्य शिक्षण बोर्डाच्या mahahsc.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हांला सुधारित वेळापत्रक आणि विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठीच्या सूचना पाहता येणार आहेत. यंदा राज्यात 12वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे 2021 दरम्यान होईल. 10वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 दरम्यान होईल.
दहावी-बारावी 2021 बोर्ड परीक्षांचे सुधारित वेळापत्रक
10वी वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
12वी व्होकेशनल जुना अभ्यासक्रम वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
12वी व्होकेशनल नवा अभ्यासक्रम वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
12वी नवा अभ्यासक्रम जनरल/ बायफोकल अभ्यासक्रम वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
12वी जुना अभ्यासक्रम जनरल/ बायफोकल अभ्यासक्रम वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
दरम्यान यंदा विद्यार्थ्यांना ते ज्या शाळेत शिकत होते तेथेच बोर्डाची परिक्षा देण्यासाठी सोय करून दिली जाणार आहे तर अन्य विद्यार्थ्यांसाठी परीक्षांसाठी अतिरिक्त वर्ग खुले केले जातील. काही दिवसांपूर्वीच यावर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी विषयनिहाय प्रश्नपेढी उपलब्ध करून दिली आहे. तर डीडी सह्याद्री वर देखील ज्ञानगंगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.