Board Exams 2021 Question Banks: कोरोना वायरस संकटामुळे मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे तीन-तेरा वाजले आहेत. अशामध्ये आता यंदाच्या 10वी (SSC), 12वी (HSC) च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा महिन्या-दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने शिक्षण विभागाकडूनही विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून उजळणीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता शाळा, कॉलेज बंद करण्यात आले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय प्रश्नपेढी (Question Bank) ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वेबसाईट वर आता दहावी, बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. maa.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला तुम्हांला याकरिता भेट द्यावी लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेता विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी विषय निहाय प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. D D Sahyadri Dyanganga: 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री चॅनेलवर 15 मार्चपासून पुन्हा विषयनिहाय तासिकांचे आयोजन; इथे पहा वेळापत्रक.
महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2021 प्रश्नपेढी डायरेक्ट लिंक्स
10 वीच्या विद्यर्थ्यांसाठी प्रश्नपेढी
12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी
दरम्यान यंदा महाराष्ट्र राज्यात 12वी ची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे आणि दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यावर शिक्षण विभाग ठाम आहे. वर्षभरापूर्वीपासून सुरू झालेलं कोरोनाचं हे आरोग्य संकट अजूनही घोंघावत आहे. राज्यभर कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू झाली आहे.