Maharashtra Scholarship Exam 2020-21 New Date: 5वी, 8वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा तारखेत पुन्हा बदल; आता 9 ऑगस्टला परीक्षा
Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रात यंदा कोरोना संकटामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले आहे. कोविडचा राज्यातील प्रादुर्भाव पाहता एप्रिल महिन्यापासून लांबणीवर पडलेली पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्टला होईल असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते पण आता पुन्हा या परीक्षा तारखेत बदल झाला आहे. 8 ऑगस्टला केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा असल्याने स्कॉलरशीप परीक्षा (Scholarship Exam) 8 ऐवजी 9 ऑगस्टला होणार असल्याचं आज जाहीर करण्यात आलं आहे. त्याबाबतचं परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे.

यंदा पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला होणार होती पण कोरोनामुळे ती 23 मे ला होणार असल्याचं सांगण्यात आलं. पण राज्यात कोरोना वायरस दुसर्‍या लाटेचा प्रभाव पाहता ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. पण आता अखेर 9 ऑगस्टला ही परीक्षा होईल. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.

महाराष्ट्रात यंदा 47 हजार 612 शाळांमधील 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे.पाचवीच्या स्कॉलरशीप परीक्षेसाठी 3 लाख 88 हजार 335 तर आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेसाठी 2 लाख 44 हजार 143 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. राज्यभर ही परीक्षा दोन्ही इयत्तांसाठी एकाच दिवशी होणार आहे. दरम्यान आज (27 जुलै) स्कॉलरशीप परीक्षेसाठी संबंधित शाळांच्या लॉगिन मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

स्कॉलरशीप परीक्षेमध्ये भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन विषयांच्या प्रत्येकी 100 गुणांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर राज्यभरातून अव्वल विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून स्कॉलरशीप धारकांची यादी जाहीर केली जाते. यामध्ये प्रामुख्याने बहुपर्यायी प्रश्नावली असते. सार्‍या विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जातात.मराठी सह 8 भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाते