महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) आज 12वीचा निकाल जाहीर आहे. महाराष्ट्रात बारावीचा निकाल 94.22% लागला आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन मार्क्स दाखवण्यात आले आहेत. दरम्यान यंदा 9 विभागीय मंडळाच्या निकालांमध्ये कोकणाने दरवर्षी प्रमाणे बाजी मारली आहे पण मुंबई विभागाची घसरगुंडी झाली आहे. यंदा सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे. मग यंदा तुम्ही देखील बारावी निकालामध्ये तुम्हांला मिळालेल्या मार्क्सवर खूस नसाल तर तुम्हांला तुमची उत्तरपत्रिका पडताळून पाहण्याची संधी आहे. तुम्ही मार्क्स व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता, तुमच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी घेऊ शकता तसेच रिव्हॅल्युएशन देखील करून घेऊ शकता. नक्की वाचा: Maharashtra Board HSC Result 2022 Declared: 12 वीचा निकाल जाहीर; mahresult.nic.in वर असे पहा मार्क्स .
दरम्यान बोर्डाकडून या सार्या सुविधा सशुल्क उपलब्ध आहेत. त्यासाठी असलेली अटी व शर्ती, शुल्क किती ते कसं भरावंं? याची माहिती सविस्तर इथे देण्यात आली आहे.
यंदा बारावीला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 14,85,191 होती. यापैकी 817,188 मुलं आणि मुली 6,68,003 आहेत. निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. मागील वर्षी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारा बारावीचा निकाल लावण्यात आला होता. पण यंंदा विद्यार्थ्यांनी परीक्षा लेखी स्वरूपात आणि एकाच सत्रात दिली आहे. आयसीएसई आणि सीबीएससी बोर्डाने मात्र दोन सत्रात बोर्डाच्या परीक्षा घेतल्या आहेत. त्यांचे निकाल लागल्यानंतर आता विविध कॉलेज मध्ये पदवीचे प्रवेश सुरू करता येणार आहेत.