12th result | File image

यंदा महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा एकूण निकाल (Maharashtra Board HSC Result) 94.22% लागल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) देण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण विभागाने 9 विभागीय मंडळामध्ये बाजी मारली आहे तर मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षण नंतर काही काही मर्यादित विद्यार्थांच्या संख्येत ऑफलाईन वर्ग सुरू करत शिक्षण सुरू झाले होते. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या सावटाखालीच परीक्षा पार पडली आणि आता शिक्षण मंडळाने यंदाचा बारावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून त्यांचे ऑनलाईन गुण पाहता येणार आहेत. त्यासाठी शिक्षणमंडळाने msbshse.co.in, hscresult.mkcl.org, mahresult.nic.in. या तीन महत्त्वाच्या वेबसाईट्स आणि अन्य काही थर्ड पार्टी साईट्सवर निकाल उपलब्ध केला आहे.

12वीचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?

  • बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेज वर 12वी निकालाचा पर्याय निवडा.
  • आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
  • त्यापुढे View Result वर क्लिक करा.
  • तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
  • तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.

हे देखील नक्की वाचा: Maharashtra Board Class 12th Result 2022: महाराष्ट्र राज्य बोर्डाचा ऑनलाईन निकाल पाहू शकत नसाल तर असे मिळवा SMS वर मार्क्स.

बारावीचा निकाल आज जाहीर झाल्यावर जर तुम्हाला अपेक्षेप्रमाणे मार्क मिळालेलं नसतील तर रिचेकिंग म्हणजेच गुणांची फेर पडताळणी करायचा पर्याय वापरता येईल. यासाठी निकालांनंतर  गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत. रिचेकिंग प्रक्रिया 10  जून ते 20  जून या कालावधीत होणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 जून ते 29 जून पर्यंत अर्ज करता येईल. रिपीट एक्साम म्हणजेच पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणे जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यासाठी 10 जूनपासून अर्ज सुरू होतील. तर विद्यार्थ्यांना मार्क्सशीट त्यांच्या कॉलेजमध्ये 17 जून दिवशी दुपारी  3वाजता वितरित केली जाणार आहे.