HSC Result | File mage

MSBSHSE 12th Results 2022: महाराष्ट्रात आज (8 जून) दिवशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची अखेर घोषणा झाली आहे. यंदा कोरोना संकटादरम्यान ऑनलाईन शिक्षण घेत पहिल्यांदा विद्यार्थी लेखी परीक्षेला सामोरे गेले आहेत. या परीक्षेचा राज्याचा निकाल 94.22 % लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.21 % लागला आहे. तर यंंदाच्या 12वी निकालामध्ये मुंबई विभागाची घसरगुंडी पहायला मिळाली आहे. मुंबई विभागाचा निकाल 90.91% लागला आहे. यंदा बोर्डाच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Board HSC Result 2022: आज दुपारी 1 वाजता 12वीचा ऑनलाईन निकाल होणार जाहीर; mahresult.nic.in  सह या वेबसाईट्सवर पहा मार्क्स .

शाखानिहाय निकाल किती टक्के?

विज्ञान – 98.30 टक्के

वाणिज्य – 91.71टक्के

कला –  90.51 टक्के

विभागानुसार निकालाची टक्केवारी

पुणे-  93.61%

नागपुर- 96.52%

औरंगाबाद- 94.97%

मुंबई- 90.91%

कोल्हापूर - 95.07%

अमरावती - 96.34 %

नाशिक - 95.03%

लातूर- 95.25%

कोकण - 97.21%

बोर्डाने आता केवळ निकाल जाहीर करताना विभागनुसार आणि शाखेनुसार आकडेवारी जाहीर केलेली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे विषयानुसार मार्क्स दुपारी 1 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहेत. ऑनलाईन सोबतच मेसेज वरूनही निकाल पाहता येणार आहे.

मागील वर्षी नियमित विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेचा निकाल 99.45%,कला शाखेचा निकाल 99.83%, वाणिज्य शाखेचा निकाल 99.91% व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा निकाल 98.80% लागला होता तर राज्याचा एकूण निकाल 99.63% लागला होता.