
MSBSHSE Class 12 Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज (8 जून) बारावीचा निकाल जाहीर करणार आहे. यंदा कोरोनाच्या संकटाच्या सावटाखाली विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून कोविड 19 नियमावलीचं काटेकोर पालन करत ऑफलाईन स्वरूपात बोर्डाने यशस्वीरित्या परीक्षा घेतल्या आहेत. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अधिक वेळ आणि अभ्यासक्रम कमी करून परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या परीक्षा निकालाकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. आज सकाळी 11च्या सुमारास बोर्डाकडून पत्रकार परिषद घेत निकालाचा लेखाजोखा मांडला जाईल त्यानंतर 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना आपले विषयानुसार गुण ऑनलाईन पाहता येणार आहेत.
दरम्यान आज विद्यार्थ्यांना त्यांचे ऑनलाईन गुण पाहण्यासाठी msbshse.co.in, hscresult.mkcl.org, mahresult.nic.in. या तीन महत्त्वाच्या वेबसाईट्स आणि अन्य काही थर्ड पार्टी साईट्सवरून देखील निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहण्यासाठी त्यांचा रोल नंबर आणि आईचं नाव ही माहिती ऑनलाईन सबमीट करावी लागणार आहे.
कसा पहाल तुमचा 12 वीचा ऑनलाईन निकाल?
- बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेज वर 12वी निकालाचा पर्याय निवडा.
- आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
- त्यापुढे View Result वर क्लिक करा.
- तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
- तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.
नक्की वाचा: Maharashtra Board 12th Result 2022 उद्या ऑनलाईन कसा आणि कुठे पहाल?
आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही शाखांमध्ये मिळून यंदा बोर्डाकडे 14,85,191 विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली होती. यापैकी 817,188 मुलं आणि मुली 6,68,003 आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या 9 विभागात हे विद्यार्थी विभागले गेले आहेत. बारावीच्या निकालानंतर पदवीसाठी विद्यार्थ्यांना कोर्सनुसार अन्य शाखेच्या सीईटी देऊन त्यांचा प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.