महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) ने जाहीर केल्यानुसार यंदा 12वीचा निकाल (HSC Result) 91.25% लागला आहे. या निकालामध्ये 9 विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर मुलांच्या तुलनेत मुली अव्वल ठरल्या आहेत. सकाळी बोर्डाने निकालाची आकडेवारी जाहीर केल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना त्यांचे एकूण टक्के, विषय निहाय गुण दुपारी 2 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे. mahresult.nic.in सह काही थर्ड पार्टी वेबसाईट वर निकाल पाहता येणार आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे रोल नंबर आणि आईचं नाव असणं आवश्यक आहे. या माहितीवर निकाल पाहता येणार आहे.
बारावीचा ऑनलाईन निकाल कुठे पहाल?
12वीचा ऑनलाईन निकाल कसा पहाल?
- mahresult.nic.in ही किंवा वर दिल्यापैकी बोर्डाची कोणतीही अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
- त्यानंतर HSC Examination Result वर क्लिक करा
- आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेकट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करा.
- त्यापुढे View Result वर क्लिक करा.
- निकाल तुमच्या स्क्रिनवर असेल.
आज निकाल जाहीर झाल्यानंतर उद्या 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज देखील विद्यार्थ्यांना करता येणार आहे. विद्यार्थ्यांना 6 जून दिवशी गुणपत्रिकेची मूळ प्रत विद्यार्थांना कनिष्ठ महाविद्यालयात दिली जाणार आहे.