Maharashtra GDS Recruitment 2021: महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये डास सेवकाच्या 2458 पदासाठी नोकर भरती
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

Maharashtra GDS Recruitment 2021: महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवकाच्या पदावर भरतीसाठी ऑनलाईन नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार एकूण 2428 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. अशातच ज्या उमेदवारांना पोस्टवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाइट appost.in ला भेट द्यावी.(KDMC Recruitment 2021: कल्याण डोंबिवली महानगरपालिका नोकरभरती; 120 जागा, पाहा पात्रता आणि अट)

या नोकर भरतीच्या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 26 मे 2021 पर्यंत अखेरची तारीख आहे. तसेच अर्ज करण्यापूर्वी नोटीस नीट वाचावी असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जर अर्जात काही चूक झाल्यास तो रद्द केला जाणार आहे. तर जाणून घ्या महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये सेवकाच्या नोकर भरती संदर्भातील अधिक माहिती.युआर-1105. ईडब्लूएस-246, ओबीसी-565, पीडब्लूडी ए-10, पीडब्लूडी बी-23, पीडब्लूडी सी-29, पीडब्लूडी डीई-15, एससी-191, एसटी-244 पदांवर नोकर भरती केली जाणार आहे.(Job Recruitment: IT क्षेत्रातील लोकांसाठी मोठी बातमी; Infosys, HCL Tech, TCS आणि Wipro देणार 1 लाख फ्रेशर्सना नोकऱ्या)

महाराष्ट्रात पोस्टल सर्कलकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार जीडीएस पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी मध्ये 10 वी पास असावे. तसेच स्थानिक भाषेचे ज्ञान असावे. तर शिक्षणासंबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकता. तर उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षादरम्यान असावे. या व्यतिरिक्त आरक्षित वर्गसाठी वयात सूट दिली जाणार आहे. तर ईडब्लूएस श्रेणीसाठी वयात सूट मिळणार नाही आहे.