Metro | (Photo Credits: Maha Metro)

Maha Metro Recruitment 2021: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिडेट यांच्याकडून विविध पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. MMRCL ने चीफ प्रोजेक्टर मॅनेजर, सीनियर डेप्युटी, जनरल मॅनेजर, डिप्टी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, सीनियर सेक्शन इंजिनियर, सेक्शन इंजिनियर, ज्युनिअर इंजिनियर, सीनियर टेक्नीशियन अॅन्ड अकाउंट असिस्टंट पदावर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.(UPSC Civil Services Final Result 2020: युपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर; 761 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी mahametro.org येथे भेट द्यावी. तर अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अंतिम तारीख 14 ऑक्टोंबर दिली गेली आहे. त्यामुळे अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा अशी सूचना दिली गेली आहे.

महत्वाच्या तारखा-

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- 23 सप्टेंबर, 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची तारीख- 14 ऑक्टोंबर, 2021

महाराष्ट्र मेट्रोकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार, अॅडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजरसाठी 1, सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजरसाठी 1 आणि डेप्युटी मॅनेजरसाठी 2 पदांसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. त्याचसोबत अन्य पदांच्या भरतीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.(IOCL Job Vacancy 2021: इंडियन ऑयल मध्ये नोकरभरती; 12 ऑक्टोबर पर्यंत iocl.com वर असा करा अर्ज)

अॅडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन मध्ये बीई, बीटेक केलेले असावे. तसेच अकाउंट असिस्टंट पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून बीकॉम केलेले असावे.