Photo Credit- X

Maharashtra State Common Entrance Test Cell कडून Maharashtra Common Entrance Test (MAH CET) 2025 परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध कोर्ससाठीच्या तारखा सीईटी सेल कडून देण्यात आल्या आहेत.यामध्ये BTech, LLB, MBA, MCA, BDes परीक्षांचा समावेश आहे. MHT CET 2025 for PCM एप्रिल महिन्यात 19 ते 27 दरम्यान होणार आहेत. तर PCB परीक्षा 9-17 एप्रिल दरम्यान होणार आहे. वेळापत्रकानुसार, MAH MBA CET 2025 1 ते 3 एप्रिल दरम्यान होणार आहे.

MEd, MPEd, BEd, आणि 3-year LLB programmes साठी रजिस्ट्रेशन 28 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार त्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण करता येणार आहे. MAH- M.P.Ed-CET 19 मार्च रोजी होणार आहे, MAH- M.P.Ed- फील्ड टेस्ट (ऑफलाईन) 20 आणि 21 मार्च रोजी, MAH-M.Ed-CET 19 मार्च रोजी होणार आहे. MAH-MCA CET 23 मार्च, 2025 रोजी आयोजित केली जाईल आणि MAH-B.Ed (General & Special) & B.Ed ELCT- CET परीक्षा  24, 25, 26 मार्च 2025 रोजी, MAH-B.P.Ed-CET 27 मार्च, MAH-B.P.Ed-फील्ड टेस्ट (ऑफलाइन) 28 मार्च ते 2 एप्रिल 2025 या कालावधीत होणार आहे. इथे पहा सविस्तर वेळापत्रक .

MAH LLB 3-Year CET Exam 2025 परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहे. आधी ही परीक्षा 20,21 मार्चला होणार होती. आता ही परीक्षा 3,4 मे दिवशी घेतली जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षासोबत या परीक्षेच्या तारखा क्लॅश होत असल्याने

परीक्षेच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. MAHACET website -mahacet.org वर सविस्तर वेळापत्रक उपलब्ध आहे.