Job Recruitments In Maharashtra State Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत नोकरीची मोठी संधी; पदभरतीसाठी अर्ज प्रक्रीया सुरु, त्वरा करा
(Photo credit: archived, edited, representative image)

देशात दिवसेनदिवस बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. पदवीधर (Graduation) शिक्षण घेवून देखील अनेक तरुण तरुणी नोकरीच्या (Job) शोधात आहेत. हल्ली सगळ्याचं क्षेत्रात नोकरीसाठी मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे.तरी नोकरीसाठी अर्ज (Application For Job) करणाऱ्यांची संख्या ही रिक्त जागांपेक्षा अधिक असल्याचं दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी बॅंकींच्या (Bank) परिक्षा देताना दिसतात पण त्यातही निवड होणाऱ्यांची संख्या अगदी तुरळक. तरी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (Maharashtra State Cooperative Bank) ज्युनिअर ऑफिसर (Junior Officer) पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन (Online) माध्यमातून अर्ज दाखल करता येणार आहेत.

 

संबंधित पदभरती बाबत MSC Recruitment 2022 बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. तरी 29 ऑगस्ट 2022 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत ज्युनिअर ऑफिसर पदांची भरतीसाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये (Age Limit) सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. नोटिफिकेशनमध्ये (Notification) संबंधित सविस्तर तपशील देण्यात आला आहे. तसेच संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे उमेदवारांना आवश्यक आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे (Resume), दहावी (SSC), बारावी (HSC) आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं (Degree Certificate), शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate), मागासवर्गीय उमेदवारांसाठी जातीचा दाखला (Cast Certificate), पासपोर्ट साईझ फोटो आणि आधारकार्ड (Aadhar Card) हे कागदपत्र सोबत जोडणे अनिवार्य आहे. (हे ही वाचा:- Job Opportunity For Engineers: इंजिनिअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी, एसएससी जेईमध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी)

 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत एकूण 11 जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे. ज्युनिअर ऑफिसर (Junior Officer) अंतर्गत ऑफिस सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेशनचे (Server Administrator) 1 पद, ऑफिस डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशनचे 1 पद (Officer (Database Administrator), नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशनचे 1 पद, सॉफ्टवेअरचे १1पद, डिजिटल पेमेंट चॅनलची 3 पदे((Digital Payments Channel) आणि सायबर सिक्योरीटी ऑपरेशनची (Cyber Security Operation )4 पदे  भरली जाणार आहेत. तरी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे अनिवार्य आहे. तसेच बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स (BCS)/एमसीए (MSA)/एमएससी कॉम्प्युटर सायन्स (MSC Computer Science)/आयटीचे (IT) शिक्षण किंवा बीई (BE)/बीटेक (B Tech) कॉम्प्युटर इंजिनीअरिंग (Computer Engineering)/इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT)/इलेक्ट्रॉनिक्स (Electronics)/इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन (Electronics & Telecommunication) पूर्ण असणे आवश्यक आहे.