Job Opportunity For Engineers: इंजिनिअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी, एसएससी जेईमध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

इंजिनीअरींग (Engineering) म्हणजे दर्जेदार पदवी. पण गेल्या काही वर्षात इंजिनीअरींगचं शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. देशात दरवर्षी इतर शिक्षण शाखेच्या तुलनेत सर्वाधिक इंजिनीअर (Engineer) पदवीधर (Graduate) होतात. याचा सरळ परिणाम इंजिनीअर पदांच्या नोकऱ्यावर (Jobs) होत आहे. इंजिनीअरींग पास करणारे अधिक आणि नोकरीची संख्या मात्र कमी झाली आहे. त्यामुळे विविध शाखेतील (Branches) इंजिनीअर नोकरीच्या शोधात एका शाखेतून दुसऱ्या शाखेत नोकरी करताना दिसतात. पण आता इंजिनिअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. एसएससी जेईमध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

 

एसएससी (SSC) विभागाकडून बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन (Border road Organization), सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट (Central Public Works Department), सेंट्रल वॉटर कमिशन (Central Water Commission) आणि मिलेट्री इंजीनियर सर्व्हिस (Military Engineer Services) यासह इतर विभागांमध्ये सिव्हिल (Civil), मॅकॅनिक (Mechanical), इलेक्ट्रिकल (Electrical) ट्रेडमध्ये विविध ज्यूनियर इंजिनीयर म्हणजेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदांसाठी पदभरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रीयेला 12 ऑगस्ट (August) पासून सुरुवात झाली असुन 2 सप्टेंबर (September) पर्यत अर्ज दाखल करता येणार आहे. तर इच्छुक उमेदवार एसएससी विभागाच्या ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर (Website) जाऊन आपला अर्ज दाखल करु शकतात. (हे ही वाचा:- Job Recruitments: LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अनेक पदांसाठी भरती जाहीर!)

 

SC, ST, दिव्यांग वर्ग आणि सर्व वर्गातील महिलांना शुल्क भरावं लागणार नाही. तर सामान्य आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासाठी 100 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. या पदांच्या नोकरीसाठी (Job Recruitment) 35,400 रुपये ते 1 लाख 12,400 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल. तसेच संबंधित नोकरीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराने इंजिनियरिंगची पदवी (Engineering Degree) किंवा डिप्लोमा (Polytechnic Diploma) पूर्ण करणे अनिवार्य आहे. या पदांवर परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. या परीक्षेत निगेटीव्ह मार्कीग (Negative Marking) असेल. या निवड प्रक्रीयेसाठी  पेपर-1 घेण्यात येईल आणि पेपर-1 उत्तीर्ण करणाऱ्यास पेपर-2 देण्यास पात्र असेल. पेपर-2  मधून उमेदवारांची अंतीम निवड करण्यात येईल.