जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर (JEE Main Result 2020 Declared) झाला आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) ने आज (11 सप्टेंबर 2020) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. विद्यार्थी, पालक आणि हा निकाल जाऊन घेऊ इच्छिणारे सर्व jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन आपले गुणपत्रक पाहू किंवा डाऊनलोड करु शकतात. तसेच आपल्या गुणपत्राची प्रिंटही काढू शकतात. दरम्यान जेईई मेन परीक्षा पास होणारे विद्यार्थी जेईई अडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी 12 सप्टेंबर 2020 पासून नोंदणी सुरु होणार आहे. जेईई अडवान्सड परीक्षा 27 सप्टेंबरपासून आयोजीत केली जाणार आहे. जर आपण जेईई मेन एग्जाम रिजल्ट तपासून पाहू इच्छित असाल तर खालील पद्धतीचा वापर करा.
असा पाहा निकाल
-
- सर्वात प्रथम अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर लॉग इन करा.
- होम पेजवर आपल्याला एग्जाम रिजल्ट/स्कोअरगार्ड 2020 पाहायाला मिळेल.
- आता यावर क्लिक करा एक नवे पेज नव्या टॅबवर उघडले जाईल.
- इथे आपला अप्लिकेशन नंबर, जन्मतारीख, सिक्योरीटी पिन भरा.
- आपला जेईई मेन रिजल्ट स्कोर स्क्रीनवर पाहायला मिळेल.
- हा रिजल्ट आपण डाऊनलोडही करु शकता. तसेच प्रिंटही करु शकता.
पीटीआय ट्विट
Result announced for JEE-Mains; 24 students score 100 percentile: National Testing Agency
— Press Trust of India (@PTI_News) September 11, 2020
ट्विट
JUST IN: Candidates who have topped #JEEMain2020 @IndianExpress pic.twitter.com/MiOcT8SyLa
— Ritika Chopra (@KhurafatiChopra) September 11, 2020
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल नशंक यांनी माहिती दिली होती की, लवकरच जेईई मेन 2020 परीक्षा निकाल जाहीर केला जाईल. त्यांनी ट्विट करुन माहिती दिली होती. प्रचंड विरोधानंतर एनटीएने 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान जेईई मेन परीक्षेचे आयोजन केले होते. संगणकाद्वारे झालल्या या परीक्षेत 8 लाखांहून अधिक परीक्षारथी सहभागी झाले होते.