ICSI Results 2022: आज दुपारी 4 वाजता जाहीर होणार  CS Foundation, CSEET परीक्षांचे निकाल; icsi.edu वर असे पहा गुण
Pic Credit- Twitter

Institute of Company Secretaries of India अर्थात ICSI कडून Company Secretary (CS) Foundation course, CS Executive Entrance Test (CSEET) 2022 चा निकाल आज (20 जुलै) दिवशी जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 4 वाजता हा निकाल विद्यार्थी पाहू शकणार आहे. icsi.edu या अधिकृत संकेतस्थळावर विषयनिहाय गुणांची माहिती दिली जाणार आहे.

निकालाच्या नोटीसीनुसार, CS Foundation exams 15 आणि 16 जुलै दिवशी पार पडली आहे तर CSEET 2022परीक्षा 9 आणि 11 जुलै दिवशी पार पडली आहे. या परीक्षेचा निकाल आता ई मार्कशीट द्वारा icsi.edu वर पाहता येणार आहे. निकालाची प्रत विद्यार्थ्यांना आता हार्ड कॉपीच्या माध्यमातून दिली जाणार नाही.

कसा पहाल निकाल?

  • निकाल पाहण्यासाठी ICSI ची अधिकृत वेबसाईट icsi.edu वर क्लिक करा.
  • आता रिझल्ट लिंक वर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन डिटेल्स सबमीट करा.
  • आता तुमचा निकाल स्क्रिन वर दिसेल तो पहा आणि डाऊनलोड करा.
  • आता निकालाची प्रिंट आऊट देखील काढू शकता.

दरम्यान CSEET 2022 च्या नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहे. ही परीक्षा 12 नोव्हेंबर 2022 दिवशी होणार आहे. CSEET July 2022 किंवा CS Foundation June 2022 परीक्षा उत्तीर्ण होणार्‍यांना आता CS Executive examination साठी ग्राह्य धरले जाणार आहे. त्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्यासाठी परीक्षा घेतली जाईल.