ICSI CSEET Results 2020 Declared: CSEET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर; icsi.edu वर पहा मार्क्स!
Online | Photo Credits: Pixabay.com

ICSI CSEET August Results 2020:  यंदा द इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने  (The Institute of Company Secretaries of India) ने आज (17 सप्टेंबर) CSEET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल अधिकृत वेबसाईट म्हणजेच icsi.edu वर परीक्षार्थी पाहू शकतात. दरम्यान यंदा देशभर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्ट आणि 31ऑगस्ट 2020 मध्ये  पहिली CS Executive Entrance Test पार पडली होती. आज त्याचा निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा यंदा घरामधूनच देण्याची मुभा देण्यात आली होती.

ICSI CSEET 2020 परीक्षेचा निकाल कसा पहाल ?

  • icsi.edu वर जा.
  • होम पेजवर तुम्हांला “CSEET results 2020” ची लिंक दिसेल.
  • त्यानंतर अत्यावश्यक माहिती भरा
  • तुम्हांला स्क्रीन वर तुम्हांला तुमचा CSEET results 2020 दिसेल.
  • निकाल डाऊनलोड करून प्रिंट आऊट काढून ठेवा

विद्यार्थ्यांना यंदा ऑनलाईन माध्यमातूनच ई रिझल्ट / मार्कशीट डाऊनलोड करायची आहे. निकालाची प्रत किंवा फिजिकल कॉपी दिली जाणार नाही असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

CSEET दरवर्षी एका वर्षात दोनदा परीक्षा घेते. यंदा दुसर्‍यांदा 21 नोव्हेंबर दिवशी परीक्षा होणार आहे असे मीडीया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. यंदा ICSI ने परीक्षेमधून Viva-Voce भाग हटवण्यात आला होता. यंदाच्या ऑगस्ट महिन्यातील परीक्षांमध्ये अपेक्षित यश ना मिळालेल्यांनाही पुढील काही महिन्यात होणार्‍या परीक्षेत पुन्हा सहभागी होता येईल.

CSEET परीक्षा यंदा MCQ पद्धतीने झाली आहे. दरम्यान पेपर 4 मध्ये 50मार्कांचे प्रश्न असतात. त्यात Current Affairs, प्रेझेंटेशन आणि कम्युनिकेशन स्किल्स या विषयांचा समावेश आहे. तर एकूण पेपर हा 140 प्रश्नांचा आणि 200 मार्कांचा असतो.