online ((Photo Credits: Pexels)

ICSI CS June exam ची अ‍ॅडमीट कार्ड्स आता कोणत्याही क्षणी जारी केली जाणार आहेत. यंदा Institute of Company Secretaries of India कडून घेतल्या जाणार्‍या CS Executive आणि Professional Programme Examinations देणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या अ‍ॅडमीट कार्ड्सची प्रतिक्षा आहे. ही अ‍ॅडमीट कार्ड्स ICSI ची अधिकृत वेबसाईट icsi.edu वर जारी केली जाणार आहेत.

Executive आणि professional परीक्षा यंदा 1 जून ते 10 जून 2022 दरम्यान घेतली जाणार आहे. देशात विविध केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. CS Foundation exam यंदा 15 जून आणि 16 जून 2022 दिवशी होणार आहे. मग या परीक्षेचे विद्यार्थी खालील दिल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप आपलं हॉलतिकीट डाऊनलोड करू शकतात.

ICSI CS June Exam Admit Cards कशी कराल डाऊनलोड?

  • ICSI ची वेबसाईट icsi.edu ला भेट द्या.
  • त्यानंतर होमपेज वर लेटेस्ट अपडेट्स लिंक वर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर ICSI CS June exam admit cards च्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिंग डिटेल्स टाका.
  • आता स्क्रिनवर तुमचं अ‍ॅडमीट कार्ड दिसेल.
  • हे अ‍ॅडमिड कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट देखील काढू शकता.

अ‍ॅडमीट रिलीज आणि परिक्षांच्या पुढील अपडेट्ससाठी तुम्हांला वेळोवेळी अधिकृत  वेबसाईटला भेट द्यावी लागेल.