Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Council for the Indian School Certificate Examinations कडून आज 2024 चे दहावी, बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार आज ICSE अर्थात दहावीचे आणि ISC अर्थात बारावीचे निकाल आज 6 मे दिवशी सकाळी 11 वाजता अधिकृत वेबसाईट वर जाहीर केले जाणार आहेत. cisce.org आणि results.cisce.org या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि निकाल पाहता येणार आहे. बोर्डाच्या साईट बरोबरच विद्यार्थ्यांना DigiLocker अ‍ॅप आणि वेबसाईट वर देखील निकाल पाहता येणार आहे.

ICSE, ISC Results 2024 कसा पहाल?

  • काऊन्सिलची अधिकृत वेबसाईट cisce.org ला भेट द्या.
  • त्यानंतर ICSE किंवा ISC result link ओपन करा.
  • आता तुमचा unique ID, index number आणि स्क्रीन वर दिसणारा security code टाका.
  • लॉग इन करून तुमचा बोर्ड परीक्षेचा निकाल तुम्ही पाहू शकाल.

CISCE चा अंतिम निकाल यंदा वादाच्या भोवर्‍यात आहे. काऊन्सिल कडून यंदाच्या बोर्ड परीक्षेमधील दोन पेपर पुढे ढकलले गेले होते. ISC चा रसायनशास्त्राचा पेपर, जो 26 फेब्रुवारीला होता, पण "अपरिहार्य परिस्थितीमुळे 21 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला. नंतर, एका परीक्षा केंद्राने प्रश्नपत्रिकेचे पॅकेट "हरवले" असे कळवल्यानंतर 12 ची मानसशास्त्र परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा 27 मार्च रोजी होणार होती परंतु नंतर 4 एप्रिल रोजी घेण्यात आली.

CISCE विद्यार्थ्यांना ICSE आणि ISC निकालांची पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुनर्तपासणीसाठी, विद्यार्थ्यांनी प्रति पेपर ₹1,000 शुल्क भरावे लागेल आणि पुनर्मूल्यांकनासाठी, त्यांना प्रति पेपर ₹1,500 भरावे लागतील. निकाल जाहीर झाल्यानंतर परिषदेच्या वेबसाइटवर हा पर्याय उपलब्ध होईल.