CISCE Result | File Image

सीबीएसई बोर्डाच्या निकालांपाठोपाठ आता The Council for Indian School Certificate Examinations कडून ICSE चे म्हणजेच 10वीचे आणि ISC म्हणजे 12वीचे  निकाल आज (14 मे) जाहीर केले आहेत. विद्यार्थी त्यांचे विषय निहाय गुण आणि अंतिम निकाल अधिकृत वेबसाईट cisce.org सोबतच cisceresults.in आणि digilocker.gov.in वर पाहू शकतात. यंदा ICSE Board Exams 2023 देशामध्ये 27 फेब्रुवारी ते 29 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. तर 12वीच्या परीक्षा (ISC Class 12 Board Exams) 13 ते 31 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. CISCE च्या  दहावीच्या परिक्षेत 98.94 टक्के तर बारावीच्या परिक्षेत 96.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ICSE Board Result 2023 कसा पहाल ऑनलाईन?

  • cisce.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होमपेजवर  Class 10,Class 12 Results 2023 ची लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल.
  • आता तुमचा unique ID आणि अन्य विचारलेले सारे तपशील भरा.
  • ICSE Class 10 Result 2023 किंवा ISC Class 12 Result तुमचा स्क्रीनवर दिसेल.
  • निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोड देखील करून शकता आणि प्रिंट आऊट काढून देखील ठेवू शकता.

SMS वर देखील निकाल पाहण्याची सोय 

0924808288 या क्रमांकावर एसएमएस पाठवून देखील तुम्हांला निकाल पाहता येऊ शकतो. त्यासाठी ICSE/ISC जो निकाल पहायचा आहे तो लिहून स्पेस टाकून 7 अंकी Unique ID टाका. तुम्हांला  CISCE कडून निकाल पाठवला जाईल. CBSE कडून बोर्ड परीक्षा निकालांनंतर आता 13-27 मे दरम्यान Post-Result Psychological Counselling सेवा .

ICSE 2023 ची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना 100 पैकी एकूण 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तर ISC वर्ग 12 ची परीक्षा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात 35 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. परीक्षेत आपल्या गुणांनी ज्यांचे समाधान झालेले नाही ते आपला निकाल रि-व्हॅल्युएशन साठी देऊ शकतात. त्यासाठी प्रति विषय 1000 रूपये फी आकारली जाऊ शकते. ही अर्ज प्रक्रिया देखील ऑनलाईन उपलब्ध आहे.