ICSE, ISC Result 2021 Date: 24 जुलैला दुपारी 3 वाजता CISCE जाहीर करणार 10वी,12वी चे निकाल; cisce.org वर असे पहा मार्क्स
Representational Image (Photo Credits: Pixabay)

CISCE Class 10th, 12th Result 2021:  Indian Certificate of Secondary Education कडून उद्या (24 जुलै) दिवशी ICSE, ISC बोर्डाचे 10वी, 12वीचे निकाल जाहीर होणार आहेत. हा निकाल दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांसाठी खुला होणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स CISCE ची अधिकृत वेबसाईट cisce.org वर पाहता येणार आहे. CISCE कडून यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10वी, 12वी च्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निकाल हा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे मार्क्स अपडेट करण्याचं काम पूर्ण झाले आहे त्यामुळे आता बोर्डाकडून अंतिम निकाल जाहीर करण्याचं काम सुरू झालं आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन 

ICSE, ISC चा  निकाल ऑनलाईन कसा पहाल?

  • cisce.org वर क्लिक करा. त्यानंतर रिझल्ट 2021 ला भेट द्या.
  • निकाल पाहण्यासाठी ICSE, ISC चा पर्याय निवडा.
  • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा एंटर करा.
  • निकाल स्क्रीन वर पाहता येईल तसेच डाऊनलोड करण्याची देखील सोय आहे.

ICSE, ISC चा  निकाल SMS द्वारा कसा पहाल?

ऑनलाईन निकाल पाहण्यासोबत एसएमएस द्वारा देखील निकाल पाहण्याची सोय आहे. याकरिता विद्यार्थ्यांना त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर 09248082883 यावे मेसेज केल्यानंतर निकाल मिळणार आहे.

10वीच्या निकालासाठी इयत्ता 9वीचे मार्क्स आणि 10वीचे अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार आहेत. तर 12वी निकालासाठी इयत्ता 11वीचे मार्क्स आणि 12वीचे अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार आहेत. अंतर्गत मूल्यमापनात इंटर्नल मार्क्स आणि प्रोजेक्ट वर्क्स यांचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार आहेत. यंदा अंदाजे 3 लाख विद्यार्थ्यांची 10,12वी परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन झाले आहे.