CISCE Class 10th, 12th Result 2021: The Council of Indian School Certificate Examination ने आज ICSE आणि ISC बोर्डाचे निकाल जाहीर केले आहेत. ICSE 10 वी आणि ISC 12 वी चा निकाल cisce.org आणि results.cisce.org या अधिकृत साईटवर पाहता येईल. त्याचबरोबर विद्यार्थी एसएमएसद्वारे देखील आपला निकाल पाहू शकतील. सुमारे 3 लाख विद्यार्थी या निकालाच्या प्रतिक्षेत होते. अखेर निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची देखील प्रतिक्षा संपली आहे.
Council च्या "Careers" पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर CISCE-affiliated शाळा ICSE आणि ISC 2021 चा निकाल पाहू शकतील. यासाठी शाळेच्या प्रिन्सिपलचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड गरजेचा आहे. निकालामध्ये चुका आढळल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना 1 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली आहे. यामध्ये निकालच्या बेरीजेमधील चुका विद्यार्थी दुरुस्त करु शकतील. दरम्यान, अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने गुण दिल्याने उत्तरप्रत्रिकेच्या रिचेकिंगसाठी कोणताही विद्यार्थी अर्ज करु शकत नाही.
ICSE, ISC चा निकाल ऑनलाईन कसा पहाल?
# CISCE च्या अधिकृत वेबसाईट cisce.org and results.cisce.org ला भेट द्या.
# निकाल पाहण्यासाठी ICSE, ISC चा पर्याय निवडा.
# निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा एंटर करा.
# निकाल स्क्रीन वर पाहता येईल तसेच डाऊनलोड करण्याची देखील सोय आहे.
ICSE, ISC चा निकाल SMS द्वारा कसा पहाल?
ऑनलाईन निकाल पाहण्यासोबत एसएमएस द्वारा देखील निकाल पाहण्याची सोय आहे.
# ICSE 10 वी चा निकाल SMS द्वारे पाहण्यासाठी ICSE<Space><Unique Id> असा मेसेज 09248082883 या नंबरवर पाठवा.
# ISC 12 वी चा निकाल SMS द्वारे पाहण्यासाठी ISC<Space><Unique Id> असा मेसेज 09248082883 या नंबरवर पाठवा.
10वीच्या निकालासाठी इयत्ता 9वीचे मार्क्स आणि 10वीचे अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार आहेत. तर 12वी निकालासाठी इयत्ता 11वीचे मार्क्स आणि 12वीचे अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार आहेत. अंतर्गत मूल्यमापनात इंटर्नल मार्क्स आणि प्रोजेक्ट वर्क्स यांचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे मार्कशिट आणि पासिंग सर्टिफिकेट DigiLocker द्वारे देण्यात येणार आहे.