ICAI CA Final Result 2019 चा निकाल जाहीर; icaiexam.icai.org असा पहा निकाल, मेरीट लिस्ट!
Representational Image (Photo Credits: Pixabay)

इंस्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटेट्स ऑफ इंडिया च्या जुन्या आणि नव्या कोर्सचा अंतिम निकाल आज (16 जानेवारी) दिवशी जाहीर करण्यात आला आहे. परीक्षार्थींना आपला निकाल icaiexam.icai.org या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकता. निकाल जाहीर झाल्याची माहिती ICAI चे केंद्रीय परिषदेचे सदस्य धीरज खंडेलवाल ने (Dheeraj Khandelwal)यांनी ट्वीट करून दिली आहे. सोबतच सीए फायनलच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

icaiexam.icai.org सोबतच caresults.icai.org,icai.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहण्याची सोय आहे. सोबत ICAI CA अंतिम परिक्षेचा निकाल एसएमएस किंवा ईमेलच्या माध्यमातून देखील पाहता येऊ शकतात.

ICAI CA अंतिम निकाल 2019 कसा पहाल?

icaiexam.icai.org वर क्लिक करा.

त्यानंतर CA अंतिम निकाल याची लिंक दिसेल.

त्यानंतर तुमचा रोल नंबर, पिन आणि अन्य लॉगिंग क्रेडेंशियल टाईप करा.

त्यानंतर तुम्हांला निकाल स्क्रीनवर पाहता येऊ शकतो.

तुम्हांला निकालाची प्रत प्रिंट आऊटच्या स्वरूपात काढण्याची सोय आहे.

SMS च्या स्वअरूपात तुम्ही निकाल पाहू शकता. ICAI CA Final Result जुन्या कोर्सचे विद्यार्थी CAIPCOLD असं लिहून (स्पेस) 6 अंकी रोल नंबर लिहून 57575 वर पाठवा. तर नव्या कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी CAIPCNEW असं लिहून (स्पेस) 6 अंकी रोल नंबर लिहून 57575 वर मेसेज पाठवल्यानंतर तुम्हांला निकाल पाहता येणार आहे.