कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सरकारी नोकरीसाठी (Government Jobs) अर्ज मागवले आहेत. त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार भारत सरकारमधील विविध मंत्रालये / विभाग / संस्थांसाठी कनिष्ठ अभियंता (Civil, Mechanical, Electrical, and Quantity Surveying & Contracts) यांच्या भरतीसाठी खुली स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. ही सर्व 7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) वेतन मॅट्रिक्सच्या लेव्हल -6 (35,400-1,12,400 रुपये) मधील गट ‘ब’ (Non-Gazetted) पदे आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 12 सप्टेंबर 2019 पूर्वी आपले ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
7 वा वेतन आयोग वेतन -
या नोकरीसाठी अर्ज करण्याची महत्वाची कारणे म्हणजे, भारी पगार आणि अनेक भत्ते हे होय. या नोकरीमधील पगार हा 7 व्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे.
वेबसाइटनुसार ग्रुप बी पदासाठी (Non-Gazetted) अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेवल-6 प्रमाणे 7 वा वेतन आयोग लागू होणार आहे. या वेतनश्रेणीनुसार 35400- 112400 / रुपये वेतन देण्यात येईल.
वय मर्यादा:
विविध मंत्रालये / विभागमध्ये कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल), सीपीडब्ल्यूडी कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), सीपीडब्ल्यूडी कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदासाठी वयोमर्यादा 32 इतकी आहे. सैनिकी अभियंता सेवा (MES) कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), कनिष्ठ अभियंता (विद्युत व यांत्रिकी), फरक्का बॅरेज प्रकल्प कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) या पदासाठी वयोमर्यादा 30 वर्षांपर्यंत आहे. (हेही वाचा: कुणी नोकरी देतं का नोकरी? आर्थिक मंदी नोकरीच्या मुळावर; Automobile सेक्टरसह अनेक क्षेत्रात नोकरभरती मंदावली)
अर्ज फी:
पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये द्यावे लागतील. ऑनलाईन पद्धतीने, भिम यूपीआय, नेट बँकिंगद्वारे किंवा व्हिसा, मास्टरकार्ड, मेस्ट्रो, रुपे क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून उमेदवार अर्जाची रक्कम भरू शकतात. आरसी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि आरक्षणासाठी पात्र असणार्या उमेदवार आणि महिला उमेदवार यांना फीमधून सूट देण्यात आली आहे.
इतर सर्व माहिती तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर प्राप्त होईल.