Goa Board Class 10 Results: गोवा राज्याच्या शिक्षण मंडळाचा 12 वी पाठोपाठ आता आज (10वी)चा निकालदेखील जाहीर करण्यात आला आहे. यंदा गोव्यामध्ये सुमारे 19663 विद्यार्थ्यांनी दहावीची बोर्डाची परीक्षा दिली आहे. गोवा बोर्डाचा यंदा 10वीचा निकाल 92.69% लागला आहे. 19663 पैकी 17893 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांचा निकाल gbshse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान बोर्डाची अधिकृत वेबसाईट मंदावली असेल तर examresults.net, indiaresults.com and results.gov.in या संकेतस्थळांवर देखील 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येऊ शकतो. 21 मे ते 6 जून दरम्यान यंदा गोव्यामध्ये 10वीच्या परीक्षा पार पडल्या आहेत.
Goa SSC Results 2020 ऑनलाईन कसा पहाल?
- examresults.net संकेतस्थळावर क्लिक करा.
- राज्यांच्या यादीमध्ये गोवा निवडा म्हणजे ही लिंक थेट त्यांच्या राज्य शिक्षण मंडळाच्या निकाल पेजवर घेऊन जाईल.
- Class 10 Results Click Here या पर्यायावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती सबमीट करा आणि तुमचा निकाल पहा.
तुम्हांला मोबाईल क्रमांकावर निकाल पहायचा असेल तर GB10<space>SEAT NUMBER – Send it to 54242 याच्या माध्यमातून तुमच्या फोनवर एसएमएसवरदेखील निकाल पाहता येऊ शकतो.
गोव्यामध्ये यंदा दहावीच्या निकालांत मुलींचे उत्तीर्ण होण्याचं प्रमाण मुलांच्या तुलनेत अधिक आहे. यावर्षी 93.26% मुली तर 92.08% मुलं उतीर्ण झाली आहेत. गोव्यामध्येही कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निकाल लावण्याच्या प्रक्रियेला वेळ लागला. तसेच परीक्षा देखील वेळापत्रकानुसार न झाल्याने निकाल लावण्याची प्रक्रिया लांबली आहे. सध्या वाढता कोरोनाचा पाहता शाळा, कॉलेज गोवामध्येही बंद ठेवण्यात आले आहेत.