
National Testing Agency कडून लवकरच Common University Entrance Test Undergraduate (CUET UG) 2025 निकाल जाहीर केला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यंदा 13 मे ते 4 जून दरम्यान CUET UG 2025 exam दिली आहे त्यांना निकालाची आता उत्सुकता आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल cuet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईट वर पाहू शकणार आहेत. दरम्यान NTA कडून काल 1 जुलै दिवशी final answer keys जारी करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाईटवर ही आन्सर की देखील पाहता येणार आहे.
CUET UG 2025 exam मध्ये आन्सर की मध्ये यंदा सार्या विषयांमधून 27 प्रश्न वगळण्यात आले आहेत. वगळलेल्या प्रश्नांसाठी, परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना प्रश्न सोडला गेला आहे की नाही याची पर्वा न करता पाच गुण दिले जाणार आहेत. त्या प्रश्नांसाठी, जिथे एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर असल्याचे आढळले, ज्या उमेदवारांनी योग्य पर्यायांपैकी कोणताही एक चिन्हांकित केला आहे त्यांना पाच गुण दिले जातील.
मागील वर्षी, CUET UG चा निकाल 28 जुलैला जाहीर झाला होता. 2023 मध्ये, CUET UG चा निकाल 15 जुलै रोजी जाहीर झाला होता आणि 2022 मध्ये, CUET UG चा निकाल 15 सप्टेंबर रोजी जाहीर झाला होता.
CUET UG 2025 चा निकाल कसा पहाल ऑनलाईन?
- cuet.nta.nic.in वर क्लिक करा.
- होमपेज वर “CUET UG 2025 Result” वर क्लिक करा.
- तुमचा application number, date of birth, आणि security PIN टाका.
- नंतर “Submit” वर क्लिक करा.
- निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट आऊट काढून ठेवा.