CS Executive & Professional Exam 2021 Result 25 ऑगस्टला जाहीर होणार असल्याच्या बातम्या खोट्या; ICSI ची ट्वीट द्वारा माहिती
निकाल। File image

CS Executive & Professional Exam 2021 Result Date: ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या CS Executive & Professional Exam 2021 चा निकाल आज (25 ऑगस्ट) जाहीर होणार असल्याच्या बातम्या वायरल होत आहेत पण काही वेळापूर्वीच ICSI ने ट्वीट करत ही वृत्त खोटी असल्याचं स्पष्ट केले आहे. 'विद्यार्थ्यांनी खोट्या वृत्तांवर विश्वास ठेवू नये लवकरच निकालाची अधिकृत तारिख जाहीर केली जाईल' असे ट्वीट द्वारा आश्वस्त करण्यात आले आहे. icsi.edu या अधिकृत वेबसाईट वर वेळोवेळचे अपडेट्स पाहता येणार आहेत. नक्की वाचा:  ICSI CS June 2021 Exam चं वेळापत्रक Icsi.edu वर जाहीर; इथे पहा नव्या, जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेच्या तारखा.

The Institute of Company Secretaries of India चं ट्वीट

 

CS Executive & Professional Exam 2021 निकाल कसा पहाल?

  • icsi.edu ला भेट द्या.
  • रिझल्ट लिंक क्लिक करा.
  • ‘Click here to view Result and Download E-Mark Sheet.’पर्याय निवडा.
  • ड्रॉपडाऊन मधून परीक्षा निवडून तुमची माहिती भरा.
  • सबमीट वर क्लिक करा
  • तुमचा निकाल स्क्रिन वर दिसेल.

दरम्यान काही दिवसांपूर्वी डिसेंबर महिन्यातील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. CS Executive and Professional exam यंदा 21 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार आहेत. एका सेशन मध्ये म्हणजे दुपारी 2 ते 5 या वेळेत या परीक्षा होतील. तर जून सेशन मधील CS Foundation, Executive, Professional exams या 20 ऑगस्ट 2021 ला संपल्या आहेत आता विद्यार्थ्यांना निकालाची आतुरता आहे.