FYJC Admission | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

CBSE बोर्डाचा वर्ग दहावीचा निकाल गेल्या शुक्रवारी जाहीर करण्यात आला. तेव्हा पासून विद्यार्थ्यांना (Students) वेध लागले ते वर्ग अकरावीच्या प्रवेश प्रक्रीयेचे. विद्यार्थ्यासह पालक अकरावी प्रवेश (Class 11 Admission) प्रक्रियेची उत्सुकतेने वाट बघत होते. पण विद्यार्थ्याची ही प्रतिक्षा आज संपणार असुन ऑनलाइन अकरावी प्रवेश (Online Admission) प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आज जाहीर होणार शक्यता वर्तवल्या जात आहे. यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या अकरावी प्रवेशाचं नियोजन सहज करता येणार आहे. अकरावी वर्गात प्रवेश घेण्यासाठी आता विद्यार्थांना थेट महाविद्यालय गाठायची गरज नसुन घर बसल्या तुमच्या लॅपटॉप (Laptop) किंवा फोनच्या माध्यमातून तुम्ही वर्ग अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज करु शकता. पण अर्ज करण्यासाठी काही अधिकृत कागदपत्रांची गरज असणार आहे. त्या कागपत्रांची यादी अधिकृत वेबसाईटवर (Website) देण्यात आली आहे.

 

महाराष्ट्रातील (Maharashtra) सात महापालिका (Maha Palika) क्षेत्रात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन (Online) पध्दतीने करता येणार आहे. राज्य मंडळातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती, तरी ‘सीबीएसई’चा निकाल जाहीर न झाल्यामुळे प्रवेशाचे वेळापत्रक (Time Table) जाहीर झालेले नव्हते. परंतु, शुक्रवारी ‘सीबीएसई’चा निकाल जाहीर झाल्यामुळे अकरावी प्रवेशाचे पुढील वेळापत्रकही जाहीर करण्यात येणार आहे. तरी वेळापत्रकानुसार विद्यार्थांनी अर्ज भरण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. ्अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याकडे दहावी वर्गाच्या गुणपत्रिकेची ऑनलाईन कॉपी (Online copy) असणं अनिवार्य असणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी या बाबींची नोंद घ्यावी अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. (हे ही वाचा:-CISCE Board Result: CISCE बोर्डाचा ISC बारावीचा निकाल जाहीर)

 

राज्यात वर्ग दहावीची परिक्षा दिलेल्या आणि त्यातून अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे तरी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहज अर्ज दाखल करणं शक्य होणार आहे. तरी मुंबई (Mumbai), नाशिक (Nashik ), पुणे (Pune) सह आणखी पाच महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी आजपासून अर्ज दाखल करु शकणार आहेत. सीबीएससी, महाराष्ट्र बोर्डातून दहावीची परिक्षा उत्तर्ण केलेल्या विद्यार्थांना आजपासून राज्यभरात वर्ग  अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. तरी संबंधीत काही बदल असल्यास राज्य शिक्षण विभागाकडून तशी माहिती देण्यात येईल.