काऊंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (Council for the Indian School Certificate Examinations) अर्थात CISCE कडून यंदा ICSE, ISC Term 2 Exams 2022 एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. नुकतीच त्याची नोटिफिकेशनद्वारा माहिती देण्यात आली आहे. दहावीच्या, बारावीच्या परीक्षेच्या तारखा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील आहेत. लवकरच त्याचं सविस्तर वेळापत्रक देखील जारी केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना अधिक माहिती अधिकृत वेबसाईट cisce.org वर पाहता येणार आहे.
शाळांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाणार आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर यंदा बोर्ड परीक्षा दोन सत्रामध्ये घेण्यात आल्या आहेत. तसेच अभ्यासक्रम पूर्ण झाल्याशिवाय शाळांनी ICSE आणि ISC बोर्ड विद्यार्थ्यांच्या प्री-बोर्ड परीक्षा देखील न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्री बोर्ड परीक्षा देखील मार्च शेवट ते एप्रिल मध्ये होणार आहेत. इथे वाचा सविस्तर नोटिफिकेशन .
नुकताच CISCE कडून दहावी, बारावीचा पहिल्या टर्मचा निकाल जाहीर झाला आहे. ही टर्म 1 परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आली होती.
महाराष्ट्र बोर्ड एकाच टर्म मध्ये दरवर्षीप्रमाणे परीक्षा ऑफलाईन घेणार आहे. मार्च- एप्रिल महिन्यात यंदा राज्यातही कोविड 19 नियमावलीचं पालन करून परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तर सीबीएसई बोर्ड देखील टर्म 2 ची बोर्डाची परीक्षा यंदा ऑफलाईन घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांचा टर्म 1 चा निकालही प्रतिक्षेत आहे. लवकरच तो देखील जारी केला जाईल.