The Council for the Indian School Certificate Examinations कडून आज (17 जुलै) दहावीचा अर्थात ICSE चा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण अधिकृत वेबसाईट्स cisce.org, results.cisce.org वर पाहता येणार आहेत. हा निकाल आज संध्याकाळी 5 वाजता जाहीर होईल. प्रत्येकाचा निकाल विद्यार्थ्यांना SMS द्वारा देखील कळवला जाणार आहे.
अधिकृत पत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार, सेमिस्टर 1,2 चे मार्क्स, प्रिजेक्ट्स, अंतर्गत मूल्यमापन यांचे गुण देखील अंतिम निकालामध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट्स, एसएमएस सोबतच Digilocker app वर देखील मार्क्स पाहता येणार आहेत. शाळांना निकाल पहायचा असल्यास त्याची स्वतंत्र सोय आहे. यासाठी संकेतस्थळावर 'Careers' portal मध्ये जाऊन प्राध्यापकांच्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड द्वारा निकाल पाहता येणार आहे.
CISCE ICSE चा निकाल कसा पहाल ऑनलाईन?
- CISCE च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होम पेज वर रिझल्ट लिंक वर क्लिक करा.
- ICSE or ISC यापैकी दहावीचा निकाल पाहण्यासाठी ICSE निवडा.
- आता तुमचा UID, Index number, आणि Captcha टाका.
- तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
- आता निकालाची प्रिंटआऊट काढा.
यंदा कोरोना संकटामुळे दहावीची परीक्षा CISCE कडून दोन टप्प्यांत पार पडली आहे. त्यापैकी सेमिस्टर 2 ची परीक्षा 25 एप्रिल ते 23 मे दरम्यान झाली आहे. आज दोन्ही सेमिस्टरचा मिळून निकाल लावला जाणार आहे. या निकालावर खूष नसणार्यांसाठी रिचेकिंगची प्रक्रिया 17 जुलै ते 23 जुलै दरम्यान सुरू ठेवली जाणार आहे.
मागील वर्षी कोरोना संकटामुळे 10वी, 12वी च्या परीक्षा रद्द झाल्या होत्या त्याऐवजी विद्यार्थ्यांंना अंतर्गत मूल्यमापनाच्या माध्यमातून निकाल दिले होते.