CISCE कडून यंदाचे 10वीचे, 12वीचे निकाल कधी जाहीर होणार? याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडीयात काही रिपोर्ट्स नुसार आज 13 मे च्या दुपारी 3 च्या सुमारास निकाल जाहीर केला जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांना अजूनही काही दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. CISCE ने अद्याप ICSE Class 10 आणि ISC Class 12 Exam 2023 च्या निकालाच्या तारखा आणि वेळ याबाबत तारीख, वेळही जाहीर केलेली नाही.
Times Now च्या वृत्तानुसार, '13 मे दिवशी CISCE कडून 10वी, 12वीचे निकाल जाहीर केले जाणार नसल्याचे एका अधिकार्याने सांगितले असल्याचे वृत्त समोर आले आहे. नक्की वाचा: CBSE कडून बोर्ड परीक्षा निकालांनंतर आता 13-27 मे दरम्यान Post-Result Psychological Counselling सेवा .
यंदा ICSE Board Exams 2023 देशामध्ये 27 फेब्रुवारी ते 29 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. तर 12वीच्या परीक्षा (ISC Class 12 Board Exams) 13 ते 31 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. ICSE 2023 ची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना 100 पैकी एकूण 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तर ISC वर्ग 12 ची परीक्षा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात 35 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. परीक्षेत आपल्या गुणांनी ज्यांचे समाधान झालेले नाही ते आपला निकाल रि-व्हॅल्युएशन साठी देऊ शकतात. त्यासाठी प्रति विषय 1000 रूपये फी आकारली जाऊ शकते. ही अर्ज प्रक्रिया देखील ऑनलाईन उपलब्ध आहे.