
Central Board of Secondary Education अर्थात सीबीएससी कडून 10वी, 12वी च्या Supplementary Examinations चं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. दहावीची पुरवणी परीक्षा 15 जुलै ते 22 जुलै आहे तर बारावीची पुरवणी परीक्षा 15 जुलै दिवशी घेतली जाणार आहे. दहावीची परीक्षा Information Technology and Artificial Intelligence पेपर्सने सुरू होणार आहे. बारावीची परीक्षा केवळ 15 जुलै दिवशी आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा सकाळी 10.30 ते 12.30 आणि 10.30 ते 1.30 या वेळेत परीक्षेच्या विषयांनुसार घेतल्या जाणार आहेत. सीबीएसई च्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी लवकरच अॅडमीट कार्ड्स दिली जाणार आहेत. दरम्यान परीक्षेच्या दिवशी त्यांना वेळेपूर्वी 15 मिनिटं आधी जाणं आवश्यक आहे.
सीबीएसईने 2025 च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे निकाल13 मे रोजी जाहीर केले. इयत्ता दहावी आणि बारावीच्या एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण 88.39% होते, जे मागील वर्षीच्या तुलनेत किंचित वाढ आहे. रिजन्स पाहता, विजयवाडा 99.60% उत्तीर्णतेसह बारावीच्या निकालात अव्वल स्थानावर आहे. इयत्ता दहावीसाठी, एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण 93.66% होते, ज्यामध्ये त्रिवेंद्रम 99.79% सह सर्वोत्तम कामगिरी करणारा रिजन म्हणून समोर आला आहे.
2026 पासून सीबीएसई बोर्ड वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेणार आहे. यामध्ये पहिली परीक्षा अनिवार्य असणार आहे. दुसरी परीक्षा ऐच्छिक असणार आहे. विद्यार्थ्यांना ज्या परीक्षेमध्ये जास्त गुण मिळतील त्या परीक्षे चे गुण गुणपत्रिकेवर दिसणार आहेत.