CBSE CTET Admit Card 2021 जारी; ctet.nic.in वरून असं डाऊनलोड करा तुमचं हॉलतिकीट
Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

द सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (The Central Board of Secondary Education) अर्थात सीबीएसई (CBSE) कडून आज (11 जानेवारी) Central Teacher Eligibility Test (CTET) 2021 परीक्षेची अ‍ॅडमीट कार्ड्स जारी करण्यात आली आहेत. उमेदवारांना त्यांची अ‍ॅडमीट कार्ड्स अधिकृत वेबसाईट ctet.nic.in वरून डाऊनलोड करता येऊ शकतात. यंदा CBSE CTET exam 2021 ही 17 जानेवारी आणि 21 जानेवारी दिवशी आयोजित करण्यात आली आहेत.

देशात सध्या कोविड 19 ची स्थिती पाहता परीक्षा सुरक्षित वातावरणामध्ये पार पाडण्याचं मोठं आवाहन आहे पण कोविड 19 प्रोटोकॉल नुसारच त्या पार पडतील असं सांगण्यात आले आहे. 17 जानेवारी दिवशी एका शिफ्टमध्ये तर 21 जनेवारी दिवशी दोन शिफ्ट मध्ये परीक्षा पार पडणार आहेत. शिफ्ट वन ची वेळ सकाळी 9.30 ते 12 आहे तर संध्याकाळची शिफ्ट 2.30 ते 5 आहे. उमेदवारांना त्यांचं हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी लॉगिन डिटेल्स एंटर करणं बंधनकारक असणार आहे.

कसं डाऊनलोड कराल अ‍ॅडमीट कार्ड?

  • ctet.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होम पेज वर “Download Admit Card CTET December 2021” या लिंक वर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन क्रेडेन्शिअल टाका. त्यामध्ये तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर बर्थ डेट असेल.
  • सबमीट वर क्लिक करा.
  • CBSE CTET 2021 Admit Card तुमच्या स्क्रिनवर दिसेल. त्यानंतर ते डाऊनलोड करून प्रिंट आऊट काढून देखील ठेवू शकता.

हे देखील नक्की वाचा: Maha TET Exam Scam: शिक्षक पात्रता परीक्षेमधील गैरव्यवहाराबाबत तुकाराम सुपे निलंबित; सात दिवसात येणार चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल .

इतर काही परीक्षांच्या तारखांसोबत CBSE CTET 2021 ची तारीख देखील क्लॅश होत असल्याने 16 डिसेंबर 2021 आणि 17 डिसेंबर 2021 ला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि आता नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा पार पडणार आहे. CTET पेपर 1 साठी आहे ज्या उमेदवारांना इयत्ता 1-5 आणि पेपर 2 ज्यांना 6-8 वर्ग शिकवायचे आहेत. जे उमेदवार इयत्ता 1-8 शिकवू इच्छितात त्यांना दोन्ही पेपर घेणे आवश्यक आहे.