सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल (CBSE 10th Result) आज जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान यंदा एकूण निकालामध्ये 0.36% वाढ झाली असून एकूण निकाल 91.46% लागला आहे. यामध्ये टॉप 5 मध्ये पुणे विभागाचा देखील समावेश आहे. पुणे विभागाचा निकाल 98.5% लागला आहे. तर अव्वल स्थानी त्रिवेंद्ररम 99.28%, चैन्नई 98.95% सह दुसर्या स्थानी, बेंगलूरू 98.23% सह तिसर्या स्थानी आहे. त्या खालोखाल पुणे विभाग 98.5% सह चौथ्या स्थानी आहे. पाचव्या स्थानी अजमेर 96. 93% आहे. सीबीएसईच्या पुणे विभागामध्ये महाराष्ट्रासह गोवा, दीव-दमण, नगर हवेली यांचा समावेशदेखील केला जातो. दरम्यान यंदा कोरोना संकटाचा फटका शिक्षणालादेखील बसला आहे. CBSE Class 10th Results 2020: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; cbseresult.nic.in वर पहा तुमचे मार्क्स.
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये यंदाच्या वर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुली 3.17% अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. तर एकूण मुली 93.31% पास झाल्या आहे. मुलांचे यंदा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 90.14% आहे. तर तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचे प्रमाण 78. 95% इतके आहे.
सीबीएसई 2020 दहावीचा निकाल
Central Board of Secondary Education (CBSE) Class 10 exam results announced. Overall Pass Percentage is 91.46% pic.twitter.com/NYi63iBY85
— ANI (@ANI) July 15, 2020
यंदाचा सीबीएसई बोर्डाचा निकाल कसा लावला?
- इयत्ता दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता, ज्यांनी सर्व परीक्षा पूर्ण केली आहे, त्यांचे त्यांनी परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे कामगिरी केली आहे, त्याआधारे त्यांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
- ज्या विद्यार्थ्यांनी तीनपेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली आहे. त्या विद्यार्थ्यांनी ज्या तीन विषयात जास्त गुण मिळवले आहेत, त्यांची सरासरी घेवून त्या गुणांकनानुसार ज्या विषयाची परीक्षा त्यांनी दिलेली नाही, त्या विषयांना तितके गुण गृहित धरले जाणार आहेत.
- ज्या मुलांनी फक्त तीनच विषयांची परीक्षा दिली आहे, त्यांना ज्या दोन विषयात जास्त गुण मिळाले आहेत, त्या गुणांची सरासरी इतर अनुपस्थित राहिलेल्या विषयांना गुण देताना ग्राह्य धरले जाणार.
यंदा 12वीचा निकाल 88.78% लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत तो यंदा वाढला आहे.