CBSE Class 10th Results 2020: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; cbseresult.nic.in वर पहा तुमचे मार्क्स

सीबीएसई बोर्डाने आज देशभर 10 वीचे निकाल देखील जाहीर केले आहेत. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर cbseresult.nic.in वर निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.

CBSE Class 10th Results 2020: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर;  cbseresult.nic.in वर पहा तुमचे मार्क्स
CBSE 10th Board Exam Result 2020 | File Image

सीबीएसई बोर्डाने (CBSE Board)  आज देशभर 10 वीचे निकाल (Class 10th Result) देखील जाहीर केले आहेत. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर cbseresult.nic.in वर निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी यंदा सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा (CBSE Class 10th Results) दिली होती. 91.46% विद्यार्थी यंदा पास झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हा थोड्या फरकाने वाढला आहे. दरम्यान यावर्षी मेरिट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय बोर्डाकडून  घेण्यात  आला आहे.  CBSE Class 10th Result: सीबीएसई बोर्ड निकालात पुणे विभाग 98.5% सह टॉप 5 मध्ये, इथे पहा संपूर्ण यादी!

सीबीएसई कडून दोन दिवसांपूर्वीच 12वीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 12वीचा निकाल 88.78% लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत तो यंदा वाढला आहे. CBSE निकाल 2020 ची मार्कशीट आणि सर्टिफिकेट्स DigiLocker च्या माध्यमातून डाऊनलोड कशी कराल?

सीबीएसई बोर्ड दहावीचा निकाल ऑनलाईन कसा बघाल?

  • बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स cbseresults.nic.in किंवा cbse.nic.in उघडा.
  • होम पेज वरील दहावी इयत्तेचा निकाल पाहण्यासाठी Class 10 Result 2020 वर क्लिक करा.
  • तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक, रोल नंबर व प्रवेशपत्रावरील योग्य ती माहिती नेमून दिलेल्या रकान्यात भरा, आणि सबमिट करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल त्यातील मार्क्स व आपले नाव तपासून घेऊन मग त्याची प्रिंट काढा.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदा 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांच्या निकाल पद्धतीमध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्‍यांनी तीनपेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली आहे. त्या विद्यार्थ्‍यांनी ज्या तीन विषयात जास्त गुण मिळवले आहेत, त्यांची सरासरी घेवून त्या गुणांकनानुसार ज्या विषयाची परीक्षा त्यांनी दिलेली नाही, त्या विषयांना तितके गुण गृहित धरण्यात आले आहेत. तर ज्या मुलांनी फक्त तीनच विषयांची परीक्षा दिली आहे, त्यांना ज्या दोन विषयात जास्त गुण मिळाले आहेत, त्या गुणांची सरासरी इतर अनुपस्थित राहिलेल्या विषयांना गुण देताना ग्राह्य धरले आहेत.

ऑनलाईन वेबसाईट प्रमाणेच आता 7 वेगवेगळ्या पर्यायांनी काल पाहण्याची सोय आहे. यामध्ये एमएमएस, डिजिलॉकर, इमेल, आयविआरएस, उमंग अ‍ॅपचा देखील वापर करता येऊ शकतो.

(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2020 12:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).