CBSE Board Exam Date Sheet 2021: माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक मंडळाच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरचं जाहीर होणार; जाणून घ्या अपडेट्स
Representational Image (Photo Credits: PTI)

CBSE Board Exam Date Sheet 2021: यावर्षी घेण्यात येणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरचं सीबीएसईद्वारे जाहीर केले जाणार आहे. सीबीएसई बोर्ड डेट शीट 2021 आज, 2 फेब्रुवारी रोजी जाहीर होईल, असं शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी 28 जानेवारी रोजी म्हटलं होतं. तत्पूर्वी, शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा 4 मे ते 10 जून दरम्यान घेण्याची घोषणा केली होती. सीबीएसई बोर्ड टाइम टेबल 2021 मंडळाकडून अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाहीर केले जाईल. (Maharashtra Board SSC HSC Exam Dates 2021: 12 वी ची परीक्षा 23 एप्रिल, 10 वी परीक्षा 29 एप्रिल पासून सुरू होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती)

दहावी आणि बारावीसाठी वेळापत्रक कसे डाउनलोड करावे -

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर जाव लागेलं. त्यानंतर 'रिसेंट एनाउंसमेंट्स' किंवा 'लेटेस्ट @ सीबीएसई' विभागात उपलब्ध असलेल्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, आपल्याला 10 वी व 12 वी च्या डेटशीट 2021 वर क्लिक करून टाइम-टेबल डाउनलोड करता येईल.

त्याचबरोबर आतापर्यंतच्या अपडेटनुसार, सीबीएसई बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षा मार्च 2021 च्या महिन्यात घेण्यात येतील. सीबीएसई बोर्ड प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारीखा संबंधित शाळांकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील. सीबीएसई बोर्डाची दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 10 जून 2021 पर्यंत पूर्ण झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी 15 जुलैपूर्वी निकाल जाहीर केला जाईल, असं म्हटलं होतं.