Maharashtra Board 10th, 12th Exams Dates: महाराष्ट्रामध्ये यंदा 12वी म्हणजेच एचएससी (HSC Exam) ची परीक्षा 23 एप्रिल तर 10वी म्हणजेच एसएससीची परीक्षा (SSC Exam) 29 एप्रिल पासून घेतली जाणार आहे अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. दरम्यान वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबतचे ट्वीट करत दहावी, बारावीच्या वेळापत्रकाबददल शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात यंदा 12 ची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे या काळात पार पडेल तर 10 वीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या महिन्याभराच्या कालावधी मध्ये पार पडणार आहे.
दहावी बारावीच्या परीक्षांसोबतच त्यांनी यंदाच्या निकालाच्या तारखेचा अंदाजही जाहीर केला आहे. 10वीचा निकाल ऑगस्ट महिन्यात तर 12 वीचा निकाल जुलै अखेरीपर्यंत जाहीर करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. Maharashtra Board HSC Exams 2021: 12 वी च्या विद्यार्थ्यांना दुहेरी दिलासा; अर्ज भरण्यास 28 जानेवारी पर्यंत मुदत सोबतच सुधारित विषय निश्चिती योजनेला ब्रेक.
12 वी बोर्ड परीक्षा 2021 च्या तारखा
यंदा एचएससी (इ. १२ वी) बोर्डाची परीक्षा येत्या २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल.#hscexam pic.twitter.com/5bMXXwevNd
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 21, 2021
10 वी बोर्ड परीक्षा 2021 च्या तारखा
एसएससी (इ. १० वी) बोर्डाची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल.#sscexams2021#sscexam pic.twitter.com/AXhFsbo9lf
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 21, 2021
दरम्यान मागील वर्षी कोरोना संकटामुळे 10 वीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलाचा पेपर रद्द करून सरासरी मार्क्सच्या आधारे निकाल लावण्यात आला होता. तर 12 वीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या होत्या. पण निकाल उशिराने लागल्याने पुढे सार्याच प्रक्रियेला वेळ लागला होता. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेत विद्यार्थ्यांना परीक्षांना सामोरे जाण्याचं आवाहन करण्यात आले आहे.