प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

CBSE Board Results 2019: Central Board of Secondary Education म्हणजेच सीबीएसईचा (CBSE) आज 12वीचा निकाल दुपारी लागणार आहे. cbse.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बोर्डाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली गेली. तर त्यानंतर काही वेळातच वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. यंदा सुमारे13 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 83.4% निकाल लागला आहे. मुलींनी यंदा निकालामध्ये बाजी मारली आहे.  CBSE '10'वीच्या परीक्षा अभ्यासक्रमात होणार बदल, 2019-20 पासून समाजशास्त्र विषयातील या प्रश्नांना लागणार कात्री!

कुठे पहाल निकाल?

http://cbse.nic.in/newsite/, http://cbseresults.nic.in/cbseresults_cms/Public/Home.aspx या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

कसा पहाल CBSE चा 12 वीचा निकाल

  • cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
  • CBSE Board 12th Result 2019 या टॅबवर क्लिक करा
  • त्यानंतर रोल नंबर, स्कूल नंबर, सेंटर नंबर  एडमिट कार्ड नंबर एंटर करा

  • त्यानंतर तुम्हांला तुमचा निकाल दिसेल. हा निकाल डाऊनलोड करण्याची सोय करण्यात आली आहे.

(नक्की पहा : SSC, HSC 2019 Result Date: दहावी, बारावी च्या विद्यार्थ्यांचा निकाल 10 जून पूर्वी maharesults.nic.in या शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर लागणार - MSBSHSE ची माहिती)

CBSE च्या सार्‍या केंद्रावरील निकाल आज जाहीर केले जाणार आहेत. हंसिका शुकला आणि करिश्मा अरोडा या मुलींनी 499  मार्कांनी देशात टॉप केलं आहे. 498 मार्कांवर गौरांगी चावला, ऐश्वर्या, भव्या या तीन मुली आहेत. बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 3 एप्रिल दरम्यान पार पडली.