Photo Credit- X

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी निकालाची प्रतिक्षा आहे. अद्याप बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केलेली नाही पण उत्तरपत्रिकांच्या व्हेरिफिकेशन (Verification) आणिच्या (re-evaluation) प्रक्रियेमध्ये बदल जाहीर केले आहेत. नव्या बदलानुसार, आता विद्यार्थ्यांना आता री व्हॅल्युएशन आणि व्हेरिफिकेशन पूर्वी त्यांच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी पाहता येणार आहे. ती पाहिल्यानंतर विद्यार्थी व्हेरिफिकेशन आणि रिव्हॅल्युएशन साठी अर्ज करू शकणार आहेत.

सीबीएसईने जाहीर केलेला हा बदल सध्याच्या पद्धतीच्या उलट आहे. यापूर्वी विद्यार्थी गुणांची पडताळणी केल्यानंतरच त्यांच्या उत्तरपत्रिकांसाठी अर्ज करू शकतात. तसेच, सध्या, त्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांची प्रत मिळाल्यानंतरच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येतो.

सीबीएसई ने या नियमांमध्ये बदल करण्यामागील कारण सांगताना या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पडताळणी/पुनर्मूल्यांकनासाठी जायचे की नाही हे ठरवण्यापूर्वी त्यांना मिळालेल्या गुणांबद्दल किंवा त्यांनी केलेल्या चुकांबद्दल स्पष्टता मिळावी हे असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Low Marks in HSC: इयत्ता 12 वी परीक्षेत मित्रांपेक्षा कमी गुण मिळालेत? परिस्थिती सकारात्मकपणे कशी हाताळाल? घ्या जाणून .

दहावी आणि बारावीच्या निकालांच्या घोषणेनंतर हे बदल लागू होतील, असे बोर्डाने म्हटले आहे. सीबीएसईने 2025 च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालांच्या घोषणेचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. दोन्ही निकाल एकाच दिवशी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. सीबीएसईची दहावीची परीक्षा 1 मार्च आणि बारावीची बोर्ड परीक्षा 4 एप्रिल रोजी संपली आहे.

सीबीएसई बोर्डाचा निकाल कुठे पहाल?

सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यावर, तो विद्यार्थी cbseresults.nic.in, results.cbse.nic.in, digilocker.gov.in आणि results.gov.in या वेबसाईट्स वर पाहू शकतात. उमेदवारांना उमंग अॅप वापरून किंवा एसएमएसद्वारे त्यांचे निकाल पाहता येणार आहे.

सध्या सीबीएसई बोर्डाच्या निकालाच्या तारखांबद्दल काही अफवा सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहेत. पण सीबीएसई ने या तारखा खोट्या असल्याचं म्हटलं आहे.