राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी 2024 (MHT-CET 2024) संदर्भात काही आक्षेप पालक,परिक्षार्थी आणि लोकप्रतिनिधी यांनी घेतले आहेत याबाबत वस्तुस्थितीदर्शक खुलासा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून करण्यात आला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषीशिक्षण या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी 2024 ही सामाईक प्रवेश परीक्षा 22 एप्रिल, 2024 ते 30 एप्रिल, 2024 (पीसीबी ग्रुप) आणि दिनांक 02 मे, 2024 ते 16 मे, 2024 (पीसीएम ग्रुप) या कालावधीत एकूण 169 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.
पीसीबी ग्रुपची परीक्षा 12 सत्रांमध्ये व पीसीएम ग्रुपची परीक्षा 18 सत्रांमध्ये घेण्यात आलेली आहे. या परीक्षेस एकूण 3 लाख 30 हजार 988 विद्यार्थी, 3 लाख 94 हजार 33 विद्यार्थिनी व 31 तृतीयपंथी उमेदवार होते. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यापैकी 6 लाख 75 हजार 377 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
उमेदवाराचे एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे असल्यास त्या प्रश्नाला ऋण गुण (Negative Marks) देण्याची पद्धत नाही. हा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने घोषित करण्यात आलेला आहे. या परीक्षेच्या निकालामध्ये कोणत्याही उमेदवाराला अनुग्रह गुण (Grace Marks) देण्यात आलेले नाहीत. या परीक्षेअंतर्गत प्रश्न अथवा उत्तर याबाबतीत पालक/परीक्षार्थी यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील, तर सीईटी कक्षामार्फत ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषयनिहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने उत्तर तालिकेमध्ये योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरीता सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
आदित्य ठाकरेंचे आरोप-
आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही महाराष्ट्रातील MH-CET परिक्षांमधील गोंधळाबद्दल प्रश्न उपस्थित केले.
विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत.
१) फेरपरीक्षा नको पण पारदर्शकता हवी.
२) विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका हव्या आहेत.
३) विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आणि टॉपर्स जाणून… pic.twitter.com/HfSrciNZ0v
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 21, 2024
या सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करुन निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सूत्रानुसार सत्रनिहाय निकाल पर्सेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे. समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे पसॅटांईल दाखविलेले आहेत. हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही. एकाच सत्रात समान गुण (Raw Score) मिळालेल्या उमेदवारांना समान पर्सेंटाईल मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे ही परीक्षा वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकी दोन सत्रात घेण्यात आलेली आहे. त्यामुळे विविध सत्रांमधील समान गुण मिळालेल्या उमेदवारांना वेगवेगळे पर्सेंटाईल मिळालेले आहेत.
तसेच उमेदवारांना उपलब्ध केलेल्या उत्तरतालिकेप्रमाणे त्यांनी काढलेले गुण त्यांना मिळालेले नाहीत, हेसुद्धा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही या कार्यालयामार्फत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषयनिहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने उत्तर तालिकेमध्ये योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरिता सीईटी कक्षाच्या cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करुन निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सूत्रानुसार सत्रनिहाय निकाल पर्सेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे. (हेही वाचा: CSIR-UGC-NET Examination June 2024 Postponed: एनटीएने पुढे ढकलली सीएसआयआर-यूजीसी-नेट परीक्षा जून 2024; 'अपरिहार्य परिस्थिती'चे दिले कारण)
ही परीक्षा वेगवेगळ्या बॅचद्वारे घेऊन त्याची एकच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते. परंतु, प्रत्येक बॅचला वेगवेगळी प्रश्नपत्रिका असते, असा आक्षेप आहे. तथापि, प्रत्येक सत्राचा निकाल स्वतंत्रपणे तयार करण्यात येतो. ही कार्यपद्धती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर आहे एप्रिल 2024 च्या परीक्षेआधी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही.