Air Force Recruitment 2021: भारतीय वायुसेनेत सिविलियनच्या पदासाठी नोकर भरती, येत्या 2 ऑक्टोंबर पर्यंत करता येईल अर्ज
Representational Image (Photo Credits: File Photo)

Air Force Recruitment 2021: जर तुम्हाला वायुसेनेत नोकर करायची असेल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण वायुसेनेत विविध एअर फोर्ट स्टेशन/ युनिटमध्ये ग्रुप सी सिविलियनच्या विविध पदांवर नोकर भरती केली जाणाार आहे. जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, सुप्रींटेंडेंट, लोवर डिविजन क्लर्क (एलडीसी, स्टोर कीपर, कुक (ऑर्डिनरी ग्रेड), पेंटर (स्किल्ड), कारपेंटर (स्किल्ड), हाउस किपिंग स्टाफ (एचकेअस). मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफच्या एकूण 174 पदांवर योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.(Coal India Recruitment 2021: भारत सरकारच्या कोल इंडिया कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, 1281 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू)

एअर फोर्स ग्रुप सी भरतीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या अॅप्लिकेशन फॉरमॅटनुसार आपला अर्ज संबंधित कागदपत्रांसह 2 ऑक्टोंबर पूर्वी दिलेल्या पत्त्यावरील एअर फोर्स स्टेशनवर जमा करावा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

रिक्त जागा-

>>स्टोर सुप्रींटेंडेंट – 3 पद

>>लोवर डिविजन क्लर्क (एलडीसी) – 10 पद

>>स्टोर कीपर – 6 पद

>>कुक (ऑर्डिनरी ग्रेड) - 23 पद

>>पेंटर (स्किल्ड) – 2 पद

>>कारपेंटर (स्किल्ड) – 3 पद

>>हाउस कीपिंग स्टाफ (एचकेएस) – 23 पद

>>मेस स्टाफ – 1 पद

>>मल्टी टास्किंग स्टाफ – 103 पद

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी.12वी आणि संबंधित पदांनुसार उत्तीर्ण असावे. त्याचसोबत उमेदवाराचे वय 18 वर्षा पेक्षा कमी आणि 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग आणि अन्य उमेदवारांना वयात सूट दिली जाईल.