Rajasthan Seizes 6 Packets Of Heroin PC TW

Rajasthan: भारत -पाकिस्तान (India Pakistan Border) सीमेवर असलेल्या गंगानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तरुणांना सीमा सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून हेरॉईनच्या (Drugs) 6.4 किलो वजनाची सहा पाकिटे जप्त केली आहे. बीएसएफने 14 ते 15 जूनच्या दरम्यान रात्री अंंमली पदार्थाची तस्करी करत असताना अटक केले. (हेही वाचा-  नागपूर विमानतळावरून 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, कस्टम विभागाची कारवाई)

 

भारत पाकिस्तान सीमेवर असलेल्या अनुपगढ परिसरात सुरक्षा दलांनी सहा किलो हेरॉईन जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. सीमा सुरक्षा दलाने या संदर्भात ट्वीटरवर माहिती पोस्ट केली आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आले आहे. ड्रोनद्वारे टाकलेले हेरॉईन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

15 जूनच्या पहाटे बीएसएफ इंटेलिजन्सना माहिती मिळाली, माहिती मिळताच, परिसरात जवानांनी छापा टाकला. गंगानगरच्या जवानांनी दोन पाकिटे जप्त केली. त्यात हिरोईन असल्याचे निर्देशात आले. ज्याचे वजन अंदाजे सहा किलोग्राम आहे. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु केली आहे.