
23 Dog Breed Ban in India: गेल्या काही वर्षांपासून भारतात कुत्र्यांकडून हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. या घटनांमध्ये कुत्र्यांनी मालक किंवा इतर लोकांना चावा घेतला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक लहान मुलेही मरण पावली आहेत किंवा गंभीर जखमी झाली आहेत. सोशल मीडियावरही अशा घटनांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या घटना पाहता केंद्र सरकारने सुमारे 23 धोकादायक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे.
केंद्र सरकारच्या शिफारसी:
- Pitbull, Rottweiler, Terrier, Wolf Dog, Mastiffs या विदेशी कुत्र्यांच्या आयात, प्रजनन आणि विक्रीवर बंदी घालणे.
- मिश्र आणि संकरित जातीच्या इतर कुत्र्यांनाही बंदी.
- संकरित आणि परदेशी जातीच्या कुत्र्यांसाठी परवाने देऊ नयेत आणि त्यांच्या विक्रीवर बंदी घालावी, असे आवाहन राज्यांना देण्यात आले आहेत.
प्रतिबंधित कुत्र्यांच्या जातींची यादीः
- पिटबुल टेरियर
- तोसा इनु
- अमेरिकन स्टेफोर्डशायर टेरियर
- फिला ब्रासीलिरियो
- डोगो अर्जेंटिनो
- अमेरिकन बुलडॉग
- बोएसबीए
- कनगाल
- सेंट्रल एशियन शेफर्ड
- काकेशियन शेफर्ड
- साउथ रशियन शेफर्ड
- टोनजैक
- सरप्लानिनैक
- जापानी तोसा ऐंड अकिता
- मास्टिफ्स
- रॉटलवियर
- टेरियर
- रोडेशियन रिजबैक
- वोल्फ डॉग्स
- कनारियो
- अकबाश
- मॉस्को गार्ड
- केन कार्सो
हा निर्णय का घेतला गेला?
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीने केंद्र सरकारला सल्ला दिला आहे की, भारताच्या परिस्थितीत विदेशी जातीचे कुत्रे आक्रमक होतात. मिश्र आणि संकरित कुत्रे देखील आक्रमकतेला बळी पडत असल्याचे समितीला आढळून आले.