Divya Pahuja (PC - @iAtulKrishan1)

Divya Pahuja Murder Case: गुरुग्राममधील प्रसिद्ध मॉडेल दिव्या पाहुजा (Divya Pahuja) हत्या (Murder) प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मॉडेल आणि गँगस्टर संदीप गडोलीची गर्लफ्रेंड दिव्या पाहुजा हिची 2 जानेवारीला हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता तब्बल 11 दिवसांनी तिचा मृतदेह हरियाणाच्या फतेहाबादमध्ये सापडला आहे. दिव्याचा मृतदेह फतेहाबादच्या टोहाना येथे सापडला. बलबीर आणि त्याच्या साथीदाराने 2 जानेवारीच्या रात्री दिव्याचा मृतदेह भाक्रा कालव्यात फेकून दिला होता. येथून वाहत तो 11 दिवसांनी तोहाना येथे पोहोचला.

दिव्याच्या कुटुंबीयांनी पटवली मृतदेहाची ओळख -

दिव्याच्या मृतदेहाचा फोटो तिच्या कुटुंबीयांना पाठवण्यात आला असून, त्यानंतर कुटुंबीयांनी तिची ओळख पटवली आहे. दिव्याचा मृतदेह पंजाबमधील एका कालव्यात फेकून दिला होता. मृतदेह वाहून हरियाणातील कालव्यात पोहोचला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. कालव्यात मृतदेह फेकणाऱ्या आरोपीलाही पोलीस आज गुरुग्रामला आणणार आहेत. आरोपी बलराज गिल याला कोलकाता विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा -Sadhus Beaten Up In West Bengal: पश्चिम बंगालमध्ये पालघरसारखी घटना होता-होता राहिली; जमावाकडून 3 साधूंना विवस्त्र करून मारहाण, पहा व्हिडिओ)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधून एका सुंदर मॉडेलची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दिव्या पाहुजा असे मॉडेलचे नाव होतं. ती गुंड संदीप गडोलीची मैत्रीण होती. मुलीच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह 3 आरोपींना काही तासांतच अटक करण्यात आली.

दरम्यान, अभिजीत सिंग, हेमराज आणि ओमप्रकाश अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीनी मृत मॉडेलचा मृतदेह कालव्यात फेकला होता. त्यानंतर आता तो 11 दिवसांनी सापडला आहे.