Shahi Snan at Kumbh Mela (Photo credits: Facebook/DY365)

Kumbh Mela 2021: उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळ्याची (Mahakumbh 2021) ची तयारी जोरात सुरू आहे. कोरोना कालावधीत होणार्‍या महाकुंभ मेळ्यात सुरक्षा गाईडलाईन्सचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. यंदा कुंभ स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना कुंभमेळ्यासाठी पास देण्यात येणार (Passes for Kumbh Mela) आहेत. कुंभमेळ्यात कोणालाही पासशिवाय कुणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. हरिद्वारचे डीएम सी. रविशंकर यांनी सांगितले की, कुंभमेळ्यात भाविकांनी प्रवेशासाठी नोंदणी करणे आवश्यक असेल. ज्या अंतर्गत भाविकांना आरटीपीसीआर अहवाल, वैद्यकीय प्रमाणपत्र व ओळखपत्र संबंधित पोर्टलवर (वेबसाइट) अपलोड करावे लागतील. रजिस्ट्रेशननंतरचं कुंभमेळा पास देण्यात येईल.

कुंभमेळ्यासाठी तैनात असलेल्या कर्मचार्‍यांच्या कोरोना लसीकरणासाठी 70 हजार लसींची मागणी करण्यात आली आहे. कुंभमेळा ड्युटीसाठी तैनात असलेल्या कर्मचार्‍यांच्या लसीकरणाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. (वाचा - Glacier Breaks in Uttarakhand: उत्तराखंडमधील जोशी मठाजवळील हिमकडा कोसळला, धरण फुटल्याने धौलीगंगेच्या पाणीपातळी वाढ; पहा व्हिडिओ)

कुंभ स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या नोंदणीसाठी, haridwarkumbhmela2021.com वर जावे लागेल. जेथे भाविकांना आरटीपीसीआर अहवाल, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि ओळखपत्र अपलोड करावे लागेल. त्यानंतर भाविकांना ऑनलाइन पास देण्यात येतील. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या स्टँडर्ट ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) मध्ये सांगण्यात आलं आहे की, भाविकांना 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट दाखवावा लागणार आहे.

यासह भाविकांना कुंभमेळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. तसेच प्रत्येक भाविकाला मास्क घालणे बंधनकारक असून कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. यंदा महाकुंभात 4 शाही स्नान होणार आहेत. प्रथम 11 मार्चला (महाशिवरात्री), दुसरे स्नान 12 एप्रिलला (सोमवती अमावस्या), तिसरे स्नान 14 एप्रिलला (वैशाखी कुंभ) आणि चौथे शाही स्नान 27 एप्रिलला (चैत्र पूर्णिमा) ला होणार आहे. ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे.